क्राईम

वृद्ध व्यक्तीची निघृण हत्या | गणेशगाव येथील घटना

गणेशगाव येथे एका वृद्ध व्यक्तीची निघृण हत्या

अकलूज पोलिसांचा तपास सुरू

माळीनगर दि.१९ (प्रतिनिधी)

माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगाव येथे आज पहाटे एका ६० वर्षीय वृध्द व्यक्तीच्या निघृण खून झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने व शांतताप्रिय गणेशगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात घटना घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव शिन्नपा व्यंकू वाघमोडे (वय ६०) रा.गणेशगाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू होते. रात्रीच्या वेळी ते या बांधकाम सुरू असलेल्या तेथे एकटेच झोपले होते. सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य खोलीत उठविण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले  हा प्रकार पाहून कुटुंबियांना फार मोठा धक्काच बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तपासाला गती देण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि इतर तपशील स्पष्ट होईल.या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी वाघमोडे यांचे डोके ठेचून आणि एक हात तोडून त्यांची निघृण हत्या केली आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी सांगितले आहे की, “या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लवकरच या प्रकरणी सत्य समोर आणले जाईल.” पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.” 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!