श्रीपूर मध्ये जीवामहाले जयंती उत्साहात साजरी – नाभिक समाजाचा अभिमान दिन
श्रीपूर मध्ये इतिहासाचा अभिमान साजरा – महाळुंग-श्रीपूरात जीवामहाले जयंती उत्साहात साजरी

श्रीपूर (ता. माळशिरस) प्रतिनिधी दत्ता नाईकनवरे
श्रीपूर येथे सर्व नाभिक बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे, पराक्रमी वीर जीवा महाले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जीवामहाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सोहळा अत्यंत श्रद्धा व अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व जीवामहाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जीवामहाले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अदम्य शौर्याचे स्मरण केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून मराठ्यांच्या इतिहासात अमर ठरलेले योगदान दिले.
यावेळी नंदकुमार काळे, देविदास काळे, सावता बुद्धिबळे, रामदास इंगळे, रोहित काळे, ज्ञानेश्वर काशीद, तानाजी बुद्धिबळे, उमेश इंगळे, प्रज्वल काळे, रमेश इंगळे, गोविंद जाधव, संभाजी बुद्धिबळे, औदुंबर यादव, केशव जाधव, मयूर जाधव, जयसिंग राऊत, गोरख जाधव, अभिजीत जमदाडे, श्रीपाद जाधव, धीरज काळे, दादा माने, चांगदेव साळुंखे, कन्हैया चौधरी आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
नाभिक समाज बांधवांनी या निमित्ताने एकतेचा व इतिहासाशी अभिमानाने नाते जोडण्याचा संदेश दिला. उपस्थित सर्वांनी “जीवा महाले अमर रहे” च्या घोषणा देत वातावरण दुमदुमवले. कार्यक्रमाचे आयोजन नाभिक बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.