पुतळा अनावरण, गाळप विस्तारीकरण, पोटॅश निर्मिती प्रकल्प शुभारंभ, बुधवारी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री अनेक दिग्गज श्रीपूरात
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा

शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवा अध्याय — श्रीपूर येथे पांडुरंग साखर कारखान्याची क्षमता वाढवली अनेक प्रकल्प सुरू होणार
श्रीपूर प्रतिनिधी (दत्ता नाईकनवरे)
श्रीपूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे स्थापन झालेल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा भव्य शुभारंभ सोहळा बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता कारखाना परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा कार्यक्रम कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला असून, १० हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप क्षमता व नवीन प्रकल्प निर्मितीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या शुभसमारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या प्रसंगी राज्यातील अनेक मान्यवर मंत्री आणि आमदारांची उपस्थिती लाभणार आहे. त्यात मा. ना. शिंदे देशमुख भोसलें (सार्वजनिक बांधकाम मंत्री), मा. ना. दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री), मा. ना. जयकुमार गोरे (आदिवासी विकास मंत्री), मा. ना. बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री), मा. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, मा. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी मान्यवरांचा समावेश आहे.
कार्यक्रमास खासदार प्रणिताताई शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार उज्ज्वल जगताप, आमदार राणू खरे, आमदार अमित पाटील, आमदार दीपक पाटील-राठोड, आमदार शशिकांत माने, तसेच प्रदेश आणि जिल्हास्तरीय नेते, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्रात दिलेले मोलाचे योगदान, शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आयोजक मंडळाने व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन – सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग,
निमंत्रक – मा. आ. प्रशांत परिचारक
स्थळ – कारखाना कार्यस्थळ, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.