स्विफ्ट चालकावरती गुन्हा दाखल | महाळुंग NH वर पुन्हा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर
अपुरी कामे, निष्काळजी प्रशासन; जीव जात आहेत पण उपाय शून्य!

पंधरा दिवसांत पाच मृत्यू
NH 965G वर अपघातांची मालिका कायम; नागरिक संतप्त
अपुरी कामे, निष्काळजी प्रशासन; जीव जात आहेत पण उपाय शून्य!
(संपादक इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल – दत्ता नाईकनवरे)
महाळुंग (ता.माळशिरस) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास निळ्या रंगाच्या स्विफ्ट कार आणि हिरो होंडा दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वेळापूर येथील लक्ष्मण अंबादास रणदिवे (वय 35) यांचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी वैष्णवी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत तिला तात्काळ अकलूज मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मृत रणदिवे हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत असून ते कामानिमित्त वेळापूर वरून टेंभुर्णीकडे जात होते. महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराच्या पाठीमागील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर हा अपघात घडला.
दुचाकीला धडक देणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 12 PN 6820) पंढरपूरहून पुण्याकडे जात होती. अपघाताच्या क्षणी एअरबॅग उघडल्याने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले; मात्र दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्विफ्ट चालक अभिजीत प्रमोद पाठक, पुणे वरती अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं 715/2025 BNS कलम 281,106 (1), 125(A), 125(B), mvact 184,134(A) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गत पंधरा दिवसांत याच महामार्गावर – संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH 965G) वर महाळुंग डांगेवाडी ते माळखांबी ब्रिजदरम्यान पाच अपघात झाले असून या सर्व अपघातांत पाच जणांचे मृत्यू झाले आहेत. याच महामार्गावरती गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुरेखा गोविंद माने-महाळुंग, नंदकुमार कपडेकर- बोरगाव, भारत वाघमारे-माळखांबी, अंतर्गत बोरगाव-वेळापूर रोडवरती दीपक खटके-बोरगाव या व्यक्तींचे अपघातामुळे मृत्यू झालेले आहेत. तसेच या महामार्गावरती रोज इतर छोट्या मोठ्या अपघातामध्ये अनेक जण अपंग झाले आहेत आणि जखमी झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची टीका होत आहे.
या भीषण अपघातांच्या मालिकेमागे महामार्गावरील अपुरी कामे, चेतावणी फलकांचा अभाव, काही ठिकाणी अंधार कोठडी समान रस्ता व वाहतुकीसाठी योग्य काळजी न घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक जीव गमावूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेण्याचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पुढील तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अंमलदार-पोहेकॉ/980 बागडे करीत आहेत.
अपघात झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी अकलूज पोलिस दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पाठवले. रस्ता वाहतुकीसाठी रिकामा करून दिला. यावेळी नॅशनल हायवे चे पथक देखील आणि ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले होते.



