महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज | DYSP ची पत्रकार परिषद

भयमुक्त मतदानासाठी पोलिसांचा निर्धार; तडीपारी व बॉन्डची मोठी कारवाई

एसएसटी–एफएसटी तैनात, कोंबिंग ऑपरेशन सुरू; अकलूज पोलिसांची मोठी तयारी
“प्रलोभनांना बळी पडू नका” – डीवायएसपी संतोष वाळके यांचे मतदारांना आवाहन

अकलूज दि.19 — (संपादक – दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज)
अकलूज नगरपरिषदेची निवडणूक जाहीर होताच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अकलूज पोलिसांनी सविस्तर उपाययोजना राबवल्या असल्याची माहिती डीवायएसपी संतोष वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे निरीक्षक नीरज उबाळे उपस्थित होते.

वाळके यांनी सांगितले की, निवडणूक कालावधीत मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, आमिष, दहशतीला, बळी पडता भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

✔ गुन्हेगारांवर लक्ष – तडीपारी व बॉन्डची कारवाई

मागील १० वर्षातील रेकॉर्ड तपासून जवळपास ३०० ते ३५० संभाव्य गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५, ५६, ५७ नुसार तडीपारीचे नऊ प्रस्ताव पाठवले असून नवीन बीएनएस ॲक्टच्या कलम १२०, १२९, १३० नुसार प्रतिबंधक बॉन्डही घेतले जात आहेत.

✔ एसएसटी, एफएसटी, सतत पेट्रोलिंग व कॉम्बिंग ऑपरेशन

निवडणुकीदरम्यान कोणत्याही बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसएसटी (फिरती पथके), एफएसटी (स्टॅटिक पथके) तैनात करण्यात आली आहेत. रात्री पेट्रोलिंग, अचानक नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन सुरू असून चोरी, अवैध धंदे व संशयितांवर सातत्याने कारवाई चालू आहे.
अलीकडेच ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

✔ अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी

निवडणुकीचा काळ जवळ आल्याने अकलूज पोलिसांनी एसआरपीएफ, आरसीपी तसेच जिल्हा मुख्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. नातेपुते, माळशिरस, वेळापूर पोलीस ठाण्यांमधूनही अतिरिक्त कर्मचारी वापरण्यात येणार आहेत.

✔ संवेदनशील व अतिसंवेदनशील बूथवर विशेष नजर

इलेक्शन कमिशनकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काही संवेदनशील बुथची प्राथमिक यादी पाठवली असून अंतिम मान्यता आयोगाकडून मिळेल. आवश्यकतेनुसार रूट मार्च व विशेष पथके तैनात केली जातील.

✔ नागरिकांना आवाहन

डीवायएसपी वाळके म्हणाले, “कोणी धमकावत असेल, पैसे वाटत असेल, प्रलोभन देत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल. पारदर्शक आणि शांततेत निवडणूक पार पडणे हेच आमचे ध्येय आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!