महाराष्ट्र

२६/११ शहीदांना अभिवादन : अकलूज पोलीस व आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

अकलूजमध्ये शहीद स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर; ५१ जणांचे रक्तदान

“रक्तदान हे पुण्यकर्म” — स्वामी सौम्यानंदाजींच्या उपस्थितीत अकलूजमध्ये भव्य उपक्रम

दत्ता नाईकनवरे,संपादक-इन महाराष्ट्र न्यूज

अकलूज येथे रक्तदान शिबिर उत्साहात; स्वामी सौम्यानंदाजींचे रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट

रक्तदान हे अत्यंत पवित्र व महत्त्वाचे पुण्यकर्म असून ते अनेकांना नवजीवन देणारे श्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन वैदिक धर्म संस्थान आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम माळशिरसचे स्वामी सौम्यानंदाजी यांनी केले.
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि भारतीय संविधान दिनानिमित्त अकलूज पोलीस ठाणे व आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शहीद जवानांच्या स्मरणार्थ मागील १७ वर्षांपासून हे रक्तदान शिबिर अविरतपणे आयोजित केले जात असून या उपक्रमाचे कौतुक अकलूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी व्यक्त केले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

शहीद दिनानिमित्त रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हरिभाऊ माने, गोरख डांगे, हेमलता मुळीक, कृषी अधिकारी उदय साळुंखे, राजीव बनकर, पोलीस पाटील विक्रम भोसले, रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, बबनराव शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार मदभावी आणि बबलू गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले तर आभार माऊली मुंडफणे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!