कोण आहेत उमेदवार? महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणूक,4 प्रभागांसाठी 36 अर्ज झाले प्राप्त. 2021
कोण आहेत उमेदवार? महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणूक,4 प्रभागांसाठी 36 अर्ज झाले प्राप्त.
महाळुंग-श्रीपूर: तालुका माळशिरस येथील नव्याने निर्माण झालेल्या महाळुंग-श्रीपूर नगरपंचायची सार्वत्रिक निवडणूक राहिलेल्या चार प्रभागांसाठी सुरू झाली आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती देऊन, त्याठिकाणी खुल्या प्रवर्गातून लढविल्या जाणाऱ्या प्रभाग 3, प्रभाग 7, प्रभाग 14 आणि प्रभाग 15 अशा एकूण चार प्रभागांसाठी आज शेवटच्या दिवसाअखेर एकूण 36 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण महिला जागेच्या प्रकारासाठी एकूण 6 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रभाग 7 मध्ये सर्वसाधारण जागेच्या प्रकारासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रभाग 14 मध्ये सर्वसाधारण महिला जागेच्या प्रकारासाठी एकूण 9 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रभाग 15मध्ये सर्वसाधारण जागेच्या प्रकारासाठी एकूण 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व उमेदवाराकडून आपल्या प्रभागांमध्ये गाठीभेटी सुरू आहेत. ओबीसी स्थगित जागेसाठी खुल्या जागेतून लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये, ओबीसी मतदार कोणाला मतांचा कौल देणार? हे येणाऱ्या 18 जानेवारीच्या मतदानानंतर, 19 तारखेला मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण महिला जागेच्या प्रकारासाठी एकूण 6 अर्ज प्राप्त झाले आहेत.
- सावंत-पाटील पल्लवी संदीप
- जाधव शोभाबाई भाऊसो
- रेडे सविता शिवाजी
- रेडे मैनाबाई भिमराव
- रेडे-पाटील दिपाली किरण
- रेडे-पाटील वैशाली भिमराव
प्रभाग 7 मध्ये सर्वसाधारण जागेच्या प्रकारासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले आहेत.
- लोणकर लिना संदीप
- लोणकर लिना संदीप
- पाटील शरद ज्ञानेश्वर
- पांढरे रघुनाथ हनुमंत
- यादव राहुल नागनाथ
- जाधव संभाजी मारुती
- महाकर दत्तू जयवंत
- जाधव रत्नदिप संभाजी
- भगत धनंजय नवनाथ
- भगत तानाजी नवनाथ
- पवार कपिल पोपट
प्रभाग 14 मध्ये सर्वसाधारण महिला जागेच्या प्रकारासाठी एकूण 9 अर्ज प्राप्त झाले आहेत.
- पाटील शारदा नामदेव
- मुंडफणे आकांशा दत्तात्रय
- महादार गीतांजली किशोर
- काळेल संगीता राजकुमार
- वाघ शुभांगी बालाजी
- पाटील वंदना तुकाराम
- यादव सोनाली नवनाथ
- नाईकनवरे संगीता आयुष्यमान
- मुलाणी सलमा रशिद
प्रभाग 15 मध्ये सर्वसाधारण जागेच्या प्रकारासाठी एकूण 10 अर्ज प्राप्त झाले आहेत.
- वाघमारे नितिन विश्वंभर
- पोखरे अजित अरुण
- जाधव नितीन शंकर
- शेख अल्लाबक्ष चाँदसो
- शेख इमरान अब्दुलकादर
- रेडे मारुती बलभीम
- आहेरसिंग अभिजित अविनाश
- पटवर्धन निनाद प्रभाकर
- मिस्कर सचिन दत्तात्रय
- शिकलकर अब्दुल दगडू
%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97
एकूण 4 प्रभागासाठी हे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात
a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}
पुणे इ.1 ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय | Ajit Pawar
राजेश टोपे व आयसीएमआर डीजी भार्गव यांच्या सोबत सविस्तर बैठक
पुणे : दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे प्रतिबंध म्हणून कोरोना पुणे जिल्हयासह शहर आणि पिंपरीमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा, शहर आणि पिंपरीमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार कोरोना विषयक आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी माहिती दिली. तसेच इयत्ता 9 वी चे वर्ग सुरू राहणार आहेत. इयत्ता 1 ली ते 8 वी चे वर्ग ऑनलाइन पध्दतीनं सुरू राहतील.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आयसीएमआर डीजी भार्गव यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन चर्चा करून 30 जानेवारी 2022 पर्यंत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा ऑफलाईन पध्दतीनं बंद राहतील परंतु त्यांचे ऑनलाइन क्लास सुरू राहतील.
%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%87-1-%e0%a4%a4%e0%a5%87-8-%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6
30 जानेवारी 2022 पर्यंत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत ऑनलाइन क्लास सुरू राहणार
a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}