
जांबुड विकास सोसायटीतर्फे सभासदांना १५% लाभांश वाटप
जांबुड ता माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने बॅक पातळीवर १००% सभासद पातळीवर ९५% दिवाळी निमित्त सभासदांना १५%टक्के प्रमाणे डिविडेंट वाटप जेष्ठ सभासद भागवत भाऊ हुंबे यांच्या हस्ते करण्यात आले.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने दिवाळी निमित्त दरवर्षी प्रमाणे सलग सात वर्ष १५% लाभांश वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे. जांबुड येथील श्री पांडूरंग मदीरात सालाबाद प्रमाणे यावर्षी सभासदांना
दिवाळी निमित्त १५% प्रमाणे डिविडेंट वाटप रक्कम ३,७६७८२ रू वाटप केली आहे. व चालू वर्षी नफा ४,८५९६० अशी माहिती सोसायटीचे सचिव सुनील विश्वनाथ डिकोळे यांनी दिली. यावेळी चेअरमन राहूल खटके यांनी सांगितले की सभासद व संचालक मंडळ यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मागील आठ वर्षांत सात वेळा १५% प्रमाणे डिविडेंट वाटप करण्यात आला आहे. तरी सभासदांनी ३१ मार्च अखेर आपले पीक कर्ज नवे जुने करून घ्यावे.आपल्या संस्थेची डिविडेंट वाटपाची परंपरा अशीच चालू राहील यासाठी सर्व सभासद संचालक यांचे सहकार्य लाभले आशी आशा व्यक्त केली.
यावेळी चेअरमन राहूल खटके, व्हा.चेअरमन प्रकाश केचे,संचालक व जेष्ठ नेते बबनराव खटके अंबादास केचे, महादेव निंबाळकर, मंगल किसन भोसले,अनिता घोगरे,हरिदास केचे, बलभीम कचरे, हरिदास कचरे, हनुमंत पिसाळ, विजयकुमार वेदपाठक, सुग्रीव चंदनशिवे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.