महाळुंग मधील शेतकरी महिलांना मिळाले बासुंदी बनविण्याचे प्रशिक्षण | Basundi | Mahalung
महाळुंग मधील महिलांना कृषी कन्यांनी दिली लघु उद्योगाची प्रेरणा

कृषीकन्यांकडून बासुंदी बनवण्याचे प्रात्यक्षिक-कृषी महाविद्यालयाचा उपक्रम.
श्रीपूर तालुका माळशिरस – महाळुंग येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी कन्यांनी महाळुंग येथील दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील महिलांना बासुंदी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यातून महिलांना लघु उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकेल.
कृषी महाविद्यालयातील आठव्या सत्रातील विद्यार्थिनी तथा कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ या कार्यानुभव अंतर्गत कृषीकन्यांनी महळूंग येथे दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील महिलांना बासुंदी कशी तयार करावी किती दुधासाठी किती साखर वापरावी आणि बासुंदी तयार करताना काय काय करावे याबाबत संपूर्ण माहिती कृषी कन्यांनी दिली.
तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच.एस. खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी सरडे, प्रतीक्षा वाघमारे, रोशनी पवार, वैष्णवी पाटील, दिपाली माने, साक्षी माळी, सिद्धी लोंढे, वैष्णवी जगताप, नेहा धापटे, शितल आंधळे या कृषी कन्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.