पांडुरंग कारखान्याच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला अधिकारी व कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजीक सेवांचा वारसा जोपासण्यात पांडुरंग परिवार पुढे

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखानाचे संस्थापक कै सुधाकरपंत परिचारक यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजीक काम उभे केले तोच वारसा पुढे चालू ठेवण्यात पांडुरंग परिवार अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पढरपूर येथिल प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.वर्षा काणे यांनी केले .
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना कामगार कल्याण मंडळ व डॉ.काणेज गायीत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व कामगार यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कारखान्याच्या गणेश हॉल मध्ये करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या .पुढे बोलताना त्या म्हणल्या की कोणत्याही विकारात रुग्णाला तातडीने उपचार होणे गरजेचे आहे . त्या साठी अत्याधुनिक यंत्रणा जवळ असणे आवश्यक आहे. यामुळे मृत्युच्या दारातून अनेक रुग्ण बाहेर येणेस मदत झाली आहे .
प्रथम स्त्रीरोग तज्ञ सुरेंद्र काणे, डॉ.वर्षा काणे, हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार, फिजीशियन डॉ.प्रवीण बाबर, अस्थिरोग तज्ञ भूषण पवार, दंतरोग तज्ञ किरण पाटे, कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी , कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे, डॉ.प्रमोद पवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करणेत आले . यावेळी कंपनीचे अधिकारी मुकुंद कुलकर्णी, संतोष कुमठेकर, अमोल बारटक्के, सोमनाथ भालेकर, रमेश गाजरे, तानाजी भोसले, भिमराव बाबर, उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ सुधीर पोफळे यांनी सर्वाचे स्वागत करून आरोग्य शिबीराचा उद्देश स्पष्ट केला . सुत्रसंचलन विजय पाटील तर आभार सोपान कदम यांनी मानले .
“आज वैद्यकिय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने असाध्य रोगांची उकल होऊन त्या प्रमाणे उपचार केले जात आहेत . त्याचा पेशंटना चागला लाभ होतो . परंतू रोगाची लक्षणे असतानाही अनेक जण डॉक्टरांकडे जाणे टाळतात याचे कारण म्हणजे तपासणीत शरीरात काही दोष आढळला तर दवाखाना मागे लागेल या भयापोटी डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते . पण प्राथमिक अवस्थेत असणारा एखादा विकार वेळीच रोखता येवून पुढील अनर्थ टळतो त्या साठी न्यूनगंड न ठेवता नियमित तपासणी करावी.”–डॉ.यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक.