MPSC | वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंत्रालयातील महसूल व विक्रीकर सहाय्यक पदी निवड
खळवे गावचे सुपुत्र वैभव दत्तात्रय ननवरे एमपीएससी परीक्षा पास

MPSC | वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंत्रालयातील महसूल व विक्रीकर सहाय्यक पदी निवड
खळवे गावचे सुपुत्र वैभव दत्तात्रय ननवरे एमपीएससी परीक्षा पास
खळवे तालुका माळशिरस येथील वैभव दत्तात्रय ननवरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc) एमपीएससी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालयातील क्लर्क, महसूल सहाय्यक आणि विक्रीकर सहाय्यक या पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये खळवे तालुका माळशिरस गावचे सुपुत्र वैभव दत्तात्रय ननवरे यांची महसूल सहाय्यक व विक्रीकर सहाय्यक यादोन्ही पदी निवड झाली आहे.
वैभव यांची निवड झाल्याचे समजताच ननवरे परिवाराने आनंदोत्सव साजरा केला. वैभव चे काका मोहन जयराम ननवरे यांचा आत्मविश्वास खरा ठरला. दसुर व खळवे पंचक्रोशी मधील सर्व नागरिकांनी, मित्रांनी, पाहुणे मंडळी, आनंद उत्सव साजरा करून गावामध्ये अभिनंदनचे फ्लेक्स लावले. वैभव पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करत होता. तेथील सर्व मित्रांनी आनंद उत्सव साजरा करून गुलालाची उधळण केली. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. वैभव दत्तात्रय ननवरे हे खळवे गावचे उपसरपंच व माळशिरस तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष दादासाहेब ननवरे यांचे बंधू आहेत. ग्रामीण भागातून यावर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनेक जणांनी यश मिळवल्याचे चित्र परिसरामधून पहावयास मिळत आहे.