महाराष्ट्र

तुमच्याकडे ताकद असेल तर लोक तुमचा सन्मान करतात-काशिनाथ देवधर

आपला देश संरक्षण क्षेत्र प्रबळ असल्यामुळे आपन संरक्षण क्षेत्रात दादा आहोत-काशिनाथ देवधर

आपला देश संरक्षण क्षेत्र प्रबळ असल्यामुळे आपन संरक्षण क्षेत्रात दादा आहोत-काशिनाथ देवधर

नातेपुते दि.२१ (संजय लोहकरे) तुमच्याकडे ताकद असेल तर लोक तुमचा सन्मान करतात ! त्याचा प्रत्यय भारताला आला आहे,आपण संरक्षण क्षेत्रात दादा आहोत म्हणूनच पंतप्रधान मोदींना परदेशी दौऱ्यात रेडकार्पेट अंथरले जाते.जी २० चे अध्यक्ष पद चालून येते हे सर्व आपण अवकाश क्षेत्रात,संरक्षण क्षेत्रात प्रबळ असल्यामुळेच होऊ शकले आहे.असे प्रतिपादन डीआरडीओ चे निवृत्त उपसंचालक काशिनाथ देवधर यांनी व्यक्त केले.

नातेपुते येथील शिवजन्मोत्सव प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या शिव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प श्री. देवधर यांनी गुंफले.अध्यक्षस्थानी डॉ.नरेंद्र कवितके हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.ॲड. रामहरी रुपनवर,सपोनी प्रवीण संपांगे हे होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते श्री. देवधर यांनी “आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण क्षेत्र “या विषयावर बोलताना सांगितले की “स्वातंत्र्यानंतर पहिली पंधरा वर्षे पंचशील तत्त्वाने वागल्यामुळे १९६२ ला आपला चीनकडून पराभव झाला.त्यानंतर आपण सक्षम होण्यासाठी पूर्ण वेळ काम करू लागलो.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी १९८३ साली सूत्रे हाती घेतल्यानंतर क्षेपणास्त्र , अवकाश क्षेत्रात प्रगती केली आहे.चाळीस वर्षापुर्वी शस्त्रे व क्षेपणास्त्र आयात करणारा आपला देश आता निर्यातदार झालेला आहे.अमेरिकेत पंतप्रधानांनी भेट दिली तर पूर्वी एक कॉलम बातमी येत होती. आज पंतप्रधानांना रेड कार्पेट टाकले जात आहे हे फक्त आपण बलवान झाल्यामुळे होऊ शकले आहे.अटलजींच्या नेतृत्वाखाली आपण अणुस्फोट घडवून आणले.देशाच्या सीमा  चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायचे असतात हे जगाला आपण दाखवून दिले. साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा,पंधरा हजारकिलोमीटरचा भूभाग अशी प्रचंड सिमा आपले सैनिक सांभाळत आहेत.आपण रशियाकडून विमान वाहतूक नौका घेत होतो ती आपण २०२२ साली २६ हजार टनाची नोका बनवली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल,नाग,अग्नि ही क्षेपणास्त्रे डॉ.कलाम यांच्या नेतृत्वाखाली आपण विकसित केली आहेत.या क्षेपणास्त्रांचा पल्ला आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे.आपण चीन,रशियापर्यंत क्षेपणास्त्रे डागू शकतो.जगातील पंधरा देश आज आपले शस्त्रे, क्षेपणास्त्रे,तेजस सारखे हेलिकॉप्टर खरेदी करण्यास इच्छुक आहेत.त्यामुळे आपला देश संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण झालेला आहे.”

या समारंभाचे अध्यक्ष ॲड. रामहरी रुपनवर म्हणाले,सलग चाळीस वर्ष व्याख्यानमाला चालवणे सोपे नाही.समाजाचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे.लष्करातील अनेक गोष्टी आपणास माहित नसतात. सरहद्दीवरील परिस्थिती माहीत नसते.लष्करातील शास्त्रज्ञ व जवान हे जनतेचे जीवन सुखी होण्यासाठी पूर्ण वेळ काम करतात”.

प्रवीण सपांगे म्हणाले, सोशल मीडियाच्या जमान्यात व्याख्यानाचे आयोजन करणे ही मोठी गोष्ट आहे.समाजाची उन्नती होणे,इतिहास व कर्तव्य आज विसरले जात आहे.त्यांना जागृत करण्याचे काम अशा व्याख्यानातूनच होत आहे.या व्याख्यानास ॲड.माधवराव मिरासदार,डॉ.एम.पी.मोरे, डाॅ.श्रीधर दाते,माजी सरपंच अमरशील देशमुख,डॉ.दत्तात्रय थोरात,विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहुण्यांचा सत्कार प्रशांत सरुडकर,शशिकांत कल्याणी, किशोर पलंगे,राहुल पद्मन,धनंजय पवार,सुनील राऊत,गणेश पागे,सुधीर दाते,मंगेश दीक्षित यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय  प्रशांत सरुडकर यांनी केले.सुत्रसंचलन औदुंबर बुधावले यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!