महाराष्ट्र

उमंग लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम

महिलांना पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शन

संग्रामनगर (केदार लोहकरे)
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माळशिरस स्थापित उमंग लोकसंचालित साधन केंद्र बोरगाव यांच्या वतीने आयोजित दि.५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दसूर (ता.माळशिरस) येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास दसुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत रुपनवर,ग्रामपंचायत सदस्य मधुकर सावंत (ग्लोबल एन्वायरो इंजिनिअरिंग पुणे),आशा सेविका चंदाराणी बनसोडे ,अंगणवाडी सेविका भाग्यश्री ननवरे,उमंग लोक संचलित साधन केंद्राच्या उपाध्यक्षा मनिषा लोखंडे,सचिव वैशाली बिले, लेखापाल शैलजा पोतदार,क्षेत्र समन्वयक रुपाली भगत,सीआरपी सोनाली नलवडे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुरुवात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून झाली व उपस्थित महिलांना पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रशांत रूपनवर म्हणाले,अति वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा -हास होवू लागला आहे.त्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे.त्याचा परिणाम लोकांना कोरोनाच्या काळात झाडेचे व ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले होते.त्यामुळे वृक्षारोपन करणे ही काळाची गरज बनली आहे.उमंग लोकसंचलित साधन केंद्राने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला आहे.त्यानंतर उपस्थित मान्यवर व बचत गाटातील महिलांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहयोगणी रुपाली भगत यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन उमंग लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक शिवाजी शेंडगे यांनी केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!