ताज्या घडामोडी

महाळुंग : पालखी महामार्गात झाला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार?  पुण्यात उपोषण सुरू

दिनकर  यादव  यांचे पुणे विभागीय आयुक्त  कार्यालया पुढे अमरण उपोषण सुरू

दिनकर  यादव  यांचे पुणे विभागीय आयुक्त  कार्यालया पुढे अमरण उपोषण सुरू

महाळुंग तालुका माळशिरस हद्दी मधून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग NH 965 G गेलेला आहे.  भूसंपादन करताना व शेतकऱ्यांना लाभ देताना मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना व यातील संबंधित इतरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग एन. एच. ९६५ जी महाळुंग हद्दीमधील बोगस व बनावट कागदपत्रे करून पैसे मिळविले आहेत. संबधीत अधिकारी व लाभधारकांवरती कडक कारवाई करून शासनाचा पैसा वसुल करणे बाबत तसेच माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली असता एक ऑफिस दुसऱ्या ऑफिसवर, दुसरे ऑफिस, तिसऱ्या ऑफिसवर टोलवा टोलवी करून लेखी उत्तरे देत आहेत. मागवलेली माहिती देत नाहीत. मग माहिती देण्यासाठी टाळाटाळ कशासाठी?  अशा अनेक बेकायदा केलेल्या कृत्यासाठी दोन महिन्यापूर्वी बांधकाम विभाग सोलापूर ऑफिसच्या समोर याच कार्यकर्त्याने उपोषण केले होते. चौकशी करून कारवाई करतो असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु काहीही केले नाही.  न्याय मिळवण्यासाठी व शासनाचा पैसा जो कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होऊन काही दलाल व शासकीय अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये गेलेला आहे. तो शासनाला परत करावा संबंधित अधिकारी, बोगस लाभधारक, बोगस कागदपत्रे बनवून, ज्यादा मूल्यांक दाखवले आहे. अशा संबंधित इतर अधिकारी यांच्यावरती कडक कारवाई करावी. यासाठी दिनकर यादव यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 14 ऑगस्ट 2023 रोजी पासून अमरन उपोषण सुरू केले आहे.

सविस्तर निवेदन व विषय

 प्रती, मा.विभागीय आयुक्त,. पुणे विभाग महोदय,

मी या निवेदना व्दारे आपल्या निदर्शनास आणून देतो की, मौजे महाळुंग ता. माळशिरस जि.सोलापूर येथून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग एन.एच. ९६५ जी गेलेला आहे. सदर भुसंपादन करते वेळी अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मुल्यांकन योग्य झालेले नाही. पुढील मुद्दयांन प्रमाणे बोगस दाखवून शासनाचे पैसे संबधीत अधिकारी व लाभधारक यांनी लाटलेले आहेत.

वरील विषया संदर्भात मी अकलूज उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग माळशिरस, बांधकाम विभाग अकलूज व वरीष्ठ ऑफीस सोलापूर, तालुका कृषी अधिकारी माळशिरस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण माळशिरस, भूसंपादन अधिकारी व उप. अ.भु. अभिलेख माळशिरस, संपादन संस्थेचे प्रतिनिधी माळशिरस यांचे कडे चौकशी साठी अर्ज व माहिती अधिकारात माहिती अनेक वेळा मागीतली होती. परंतु यामध्ये मोठा भ्राष्टाचार झाले मुळे सर्वांनी एकमेकांकडे माहिती मिळेल असे लेखी देवून स्वतःला भ्रष्टाचारातून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी मा. अभियंता साो. बांधकाम विभाग सोलापूर यांचे ऑफीस समोर उपोषण देखील केले आहे. कारवाई करतो म्हणून नुसते लेखी दिले परंतु अद्याप काहीही केले नाही. त्यामूळे मला मानसिक त्रास व माझे मोठे नुकसान झाले आहे.

मला व माझ्या सारख्या पिडीतांना न्याय मिळण्षासाठी व शासनाची फसवून करून कोटयावधी रूपये भ्रष्टाचार करून लाटणारे संबधीत अधिकारी, दलाल, व भ्रष्टाचार करून जादा पैसे मिळवलेले लाभ धारक शेतकरी यांचे वरती कडक कारवाई करून शासनाच कोटयावधी रूपये माघारी घ्यावेत. व फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ही विनंती .

भ्रष्टाचार केलेले मुद्दे व फसवणूक केलेले विषय पुढील पमाणे आहेत.

१. महाळुंग हद्दी मध्ये बांधीव व पक्या घरांना कमी पैसे व मातीच्या व पत्रा शेड असणाऱ्या घरांना जादा अर्थिक लाभ दिलेला आहे. जुन्या व चिखल मातीच्या घरांना जादा डुप्लीकेट उतारे व असेसमेंट करून जादा पैसे दिले आहेत :

२. काही नागरीकांची घरे महामार्गात गेलेली नसताना त्यांना भरमसाठ मॅनेज करून लाभ दिला गेला आहे.

३ . खाजगी दलाल यांच्या मार्फत मुल्यांकन वाढवून जादा पैसे दिलेले आहेत.

४ . महाळुंग-श्रीपूर नगरपंचायती कडून बोगस अॅसेसमेंट उतारे काढलेले आहेत. त्यामध्ये घरांच्या खोल्या वाढवून बांधकामाच्या तारखा बदलेल्या आहेत. एका घराचा चार जणांना लाभ दिलेला आहे.

५. महामार्गात गेलेल्या गटामधून पाईप लाईन वोअर विहीरी नसताना दाखवून भरमसाठ पैसा दिला गेलेला आहे. सर्व कागदपत्रे बोगस केलेली आहेत.

६ . फळझाडे नसताना आणि लहान असताना कमी संख्या असताना जादा दाखवून बोगस प्रकरणे करून शासनाचा पैसे संबधीत अधिकारी शेतकरी यांनी हाडप केला आहे.

७. वरील सर्व विषयांचे ठोस पुरावे जे आपल्या दप्तरी जोडलेले आहेत. कागदपत्रे फोटो व इतर ते सर्व काही जणांची बोगस आहेत . व सद्या परिस्थिती आपण येवून पाहिली तर पूर्ण वेगळी आहे.

८. संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी महामार्ग वेळापुर येथे पुरातन संवधीत मंदीराला चिकटून रोड गेला आहे. तर महाळुंग येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग येथे डबल क्षेत्र संपदीत करून संबधीत काही शेतकऱ्यांनी परत जादा क्षेत्र अधिकारी यांना मॅनेज करून लाभ घेण्याचा कागदोपत्री प्रयत्न केला आहे.

९ . वरील सर्व विषयांची चौकशी करून संबधीतांवरती गुन्हे दाखल करून कडक कारवाई करे पर्यंत सर्व चालू असलेली भूसंपदान लाभ देणेची कारवाई थांबविण्यात यावी.

तरी वरील सर्व विषांची पूर्ण चौकशी करून नवीन सर्व सत्य कागदपत्रे मागवून घ्यावीत संबधीतांचे परत मुल्यांकन करण्यात यावे . तसेच बोगस घेतलेला आर्थिक लाभ तात्काळ परत घेण्यात यावा . संबधीत अधिकारी व कर्मचारी व लाभधारक यांचे वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येवून सेवेतून वडतर्फ करण्यात यावे .

अशा मागणीसाठी त्यांनी 14 ऑगस्ट पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण धरले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!