रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी केले शेती विषयी शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन
लवंग येथे "ग्रामीण कृषी कार्यानुभव" या उपक्रमाचे उदघाटन

लवंग येथे “ग्रामीण कृषी कार्यानुभव” या उपक्रमाचे उदघाटन
पीकांवरील रोगांची घ्यावयाची काळजी व उपाय, भरघोस उत्पन्न होण्यासाठीचे मार्गदर्शन
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लवंग तालुका माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे सर, प्रा. एस.एम एकतपुरे सर कार्यक्रम समन्वयक , कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर सर व प्रा. एच. एस.खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच उत्तम भिल्लारे, उपसरपंच मधुकर वाघ, संचालक धनाजी चव्हाण (सहकार महर्षी कारखाना ) , विक्रम भोसले ( पोलीस पाटील) , मोहन मिटकल( ग्रामविकास अधिकारी, लवंग) , डॉ. जाधव ( प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंग) , बापू खंडागळे ( ग्रामपंचायत क्लर्क)उपस्थित होते.
माती परीक्षणाचे मुल्य, पीकांवरील रोगांची घ्यावयाची काळजी व उपाय, भरघोस उत्पन्न होण्यासाठीचे मार्गदर्शन, शेतमाल निर्यात व साठवणूक याचे फायदे व तोटे याबाबतही मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषीकन्या उत्कर्षा फुले , अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, वैष्णवी सानप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तरी या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषि कन्याचा सन्मान करण्यात आला आणि ग्रामस्थांनी सहकार्याची हमी दिली.