महाराष्ट्र

महाळुंगमध्ये २५ लाखांचा गांजा जप्त – अकलूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई

१२९ किलो गांजासह २५ लाखांचा साठा हस्तगत – अकलूज पोलिसांची मोठी मोहीम

१२९ किलो गांजासह २५ लाखांचा साठा हस्तगत – अकलूज पोलिसांची मोठी मोहीम

महाळुंग तालुका माळशिरस महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत हद्दीमध्ये अकलूज पोलिसांनी २५ लाखांहून अधिक किंमतीचा गांजाचा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. दिनांक १० जून २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डांगेवस्ती, उजनी कॅनॉल जवळील राजु महादेव काळुंखे याच्या घरी छापा टाकून तब्बल १२९.४२६ किलो गांजा जप्त केला. या अंमली पदार्थाची एकूण किंमत रु. २५,६८,३४०/- इतकी असल्याचे सांगण्यात आले.

सदर ठिकाणी घरात चार गोण्या आणि घराच्या बाहेर एक गोणी सापडली असून त्यामध्ये प्लास्टिक टेपने गुंडाळलेले गांजाचे पुडे आढळले. या प्रकरणात राजु महादेव काळुंखे (रा. महाळुंग) आणि आनंद भगवान भिसे (रा. अकलूज महादेवनगर ) यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act 1985, कलम 8(सी), 22(सी), 29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, स.पो.नि. योगेश लंगुटे, स.पो.नि. गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वणवे, पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, किशोर गायकवाड, अजय बुरले, सोमनाथ माने, मोहन मस्के, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, चालक महादेव जाधव, शरद आगलावे यांनी कामगिरी केली आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत. पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आघात करणारी ठरली आहे.

“अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी मागणार आहे.  याचा सखोल तपास करून जिथपर्यंत या प्रकरणाचे पालेमुळे आहेत त्या सर्व  संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार कारवाई करणार”- सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!