श्रीपूर मध्ये साजरी झाली जिवाजी महाले यांची जयंती | Jivaji Mahale
मान्यवरांच्या शुभहस्ते केले प्रतिमापूजन

श्रीपूर तालुका माळशिरस महाळुंग, बोरगाव, श्रीपूर व परिसरातील सर्व नाभिक बांधवांनी छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले (Jivaji Mahale) यांची जयंती श्रीपूर मध्ये साजरी केली. सकाळी मान्यवरांच्या शुभहस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ह भ प अजित महाराज खंडागळे यांनी जिवाजी महाले यांच्या कार्याचा आढावा आपल्या व्याख्यानातून सांगितला. क्रांती मित्र संस्थेचे अध्यक्ष किरणजी भांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित करून जिवाजी महाले यांचे कार्य सांगितले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल जाधव, यशवंत नगर ग्रामपंचायतचे सदस्य अण्णा डांगे, पैलवान अशोक चव्हाण, रावसाहेब सावंत पाटील, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक तानाजी भगत, विक्रमसिंह लाटे, मौला पठाण, सागर यादव, दत्ता दोरगे, सतीश पवार, दादा जाधव, अजित गायकवाड, मामा माने सर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते शामराव भोसले, मेजर जालिंदर लोखंडे, नागनाथ वाघमारे सर, अमरसिंह पिसाळ देशमुख, दादा लाटे, बबन कदम, आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दुपार सत्रामध्ये उत्तमराव जानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी प्रतिमा पूजन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास काळे, रोहित काळे, उमेश इंगळे, औदुंबर वाघमारे, जालिंदर काळे, आबा वाघमारे, केशव जाधव, दादा काशीद, संभाजी बुद्धिबळे, मयूर जाधव, चांगदेव साळुंखे, राजेंद्र खंडागळे मेजर, किशोर चौधरी, सिद्धांत काशीद, दत्ता माने, प्रकाश काशिद, ज्ञानेश्वर काशीद, सोनू काशीद, प्रज्वल काळे, मनोज काळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.