लोणकर कॉम्प्युटरची ग्रामीण भागात गगन भरारी, पुरस्कार प्रदान | MKCL | Lonkar Computer
लोणकर कॉम्प्युटर संगणक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी - संदीप लोणकर ( मालक)

संगणक साक्षरतेत अग्रगण्य लोणकर कॉम्प्युटर सेंटर
लोणकर कॉम्प्युटरला रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान
माळीनगर : माळीनगर (ता.माळशिरस) येथील लोणकर कॉम्प्युटर यांनी आपल्या परिसरात संगणक साक्षरता आणि संगणकावर आधारित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव योगदानाबद्दल एमकेसीएल यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक ऍडमिशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक वीणा कामथ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार घेताना लोणकर कॉम्प्युटर सेंटरचे व्यवस्थापक समीर लोणकर, सुप्रिया जाधव त्यावेळी वरिष्ठ महाव्यवस्थापक विकास देसाई, अमित रानडे, अतुल पाटोदी, नटराज कटकधोंड, उप महाव्यवस्थापक डॉ. दिपक पाटेकर, रिजनल मॅनेजर कोषल ओहोळ, दिपक कुंभार, विभागीय समन्वय महेश पत्रिके, सोलापूर जिल्हा समन्वय रोहित जेऊरकर, हरून शेख, मलिक शेख, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.
एमकेसीएल कृत विविध कोर्सेसच्या माध्यमातून वर्ष २०२३ मध्ये लोणकर कॉम्प्युटर यांनी आपल्या परिसरात संगणक साक्षरता आणि संगणकावर आधारित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारक्षम युवा पिढी निर्मितीसाठी आणि इंडस्ट्री-रेडी असे कोर्सेस चालवून विद्यार्थ्यांना सक्षम करत आहात. सततच्या व सुसंगत प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. या क्षेत्रामध्ये योगदानाबद्दल वर्ष २०२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्रातील सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या गेले २४ वर्षापासून लोणकर कॉम्प्युटर संगणक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहे. अशी माहिती लोणकर कॉम्प्युटरचे मालक संदीप लोणकर यांनी दिली