रणजीत भैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते महाळुंग-श्रीपूर मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
महाळुंग यमाईदेवी मंदिर पुनर बांधकाम ठिकाणी भेट | घेतले यमाईदेवीचे दर्शन व आशीर्वाद

आ.बबनदादा शिंदे यांच्या फंडातून महाळुंग-श्रीपूर मध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर, विकास कामांचा झाला शुभारंभ
रणजीत भैय्या शिंदे यांनी महाळुंग-श्रीपूर ग्रामस्थांशी साधला संवाद

श्रीपूर तालुका माळशिरस महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रभागांमध्ये माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार फंडातून कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रणजीत शिंदे यांनी महाळुंग यमाईदेवी मंदिर, पुनर बांधकाम ठिकाणी भेट देऊन यमाईदेवीचे आशीर्वाद व दर्शन घेतले. यावेळी महाळुंग-श्रीपूर ग्रामस्थांशी संवाद साधला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील सुरेश आठवले यांचे घर ते आत्माराम वाघमारे यांच्या घरापर्यंत पाईप गटार करणे : ३५ लक्ष ८५ हजार, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील ढवळे वस्ती ब्रिज पासून हरी रेडे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : १४ लक्ष ७४ हजार, प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील नेवरे रोड ते गणपती मंदिर जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे : ८ लक्ष ७० हजार, प्रभाग क्रमांक ३ मधील महाळुंग – मिरे रोड ते संपत देशमुख वस्तीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : ६१ लक्ष ७ हजार, प्रभाग क्रमांक ३ मधील जाधव वस्ती पासून तांबवे रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे : ३३ लक्ष १५ हजार या सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महाळुऺग-श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते- नगरसेवक राहुल (आप्पा) रेडे-पाटील ,रावसाहेब सावंत पाटील, मौलाचाचा पठाण, नगरसेवक नामदेव इंगळे, शिवाजी रेडे-पाटील, नामदेव पाटील, विक्रम लाटे, दादासाहेब लाटे, दत्तात्रय रेडे-पाटील, बाळासो भगत, शिवाजी(दादा) रेडे-पाटील, शरद पाटील, सुरेश मुंडफणे, भीमराव(अण्णा) रेडे-पाटील, काकासाहेब झगडे, रोहित काळे, जाबुऺडचे सरपंच राहुल खटके, लवऺगचे राहुल टिक, माळखाऺबीचे चेअरमन मनोज शेळके, रामचंद्र भांगे, सचिन रेडे, नितीन पाटील, धनंजय माने देशमुख, महेश जाधव, विष्णू जाधव, संजय भगत, काकासो सावंत-पाटील, प्रेमकुमार लांडगे, गणेश कदम, पोपट रेडे, विलास ढवळे, दादा ढवळे, शिवाजी पाटोळे, संदीप घाडगे, शैलेश शेंडगे, महंमद डांगे, अशोक जाधव, पोपट कदम, भाऊसो साळुंखे, उल्हास यादव, हनुमंत चव्हाण, पांडुरंग इंगळे, वजीर डांगे, बंडू काळे, बापु कोळी, सुरेश भगत, लक्ष्मण आतार, कैलास यादव, राज आठवले, विलास महाडिक, अशोकराव जाधव, लखन धुमाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

दुपारी गट नेते राहुल आप्पा रेडे-पाटील यांच्या घरी सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये भविष्यात आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागांमध्ये भरघोस विकास निधी देऊन महाळुऺग-श्रीपूर गावचा विकास केला जाईल, असे रणजीत भैया शिंदे यांनी सांगितले.




