पांडुरंग कारखान्याकडून ऊस तोडणी मजुरांची झाली आरोग्य तपासणी
लसीकरण व उपचार देखील करण्यात आले

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वतीने ऊस तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना नेहमीच कामगारांच्या आणि ऊस तोडणी मजुरांच्या हिताचे, आरोग्याचे उपक्रम राबवित असते. त्यापैकीच आज कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावरती उपचार देखील करण्यात आले त्याचबरोबर त्यांना लस देखील देण्यात आली.
कारखान्याचे माळशिरस तालुक्यातील बोरगाव रोड लगत असणाऱ्या गट सेंटरमध्ये कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंतराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी मजूर व त्यांचे कुटुंबातील सर्वांची आरोग्य तपासणी करून लसीकरण व उपचार करण्यात आले. शेतीअधिकारी संतोष कुमठेकर यांनी तोडणी मजूरांचे आरोग्य तपासणी शिबिर लसीकरण व कारखान्याचे वतीने त्यांना पुरवण्यात येणार्या सुविधांची माहिती दिली. ऊस तोडणी मजुरांना कारखान्याकडून पिण्याचे शुध्द पाणी पुरवण्यात आले आहे, लहान मुलं बालकांना अंगणवाडी बालवाडी तसेच साखर शाळा सुरू केल्या आहेत लहान मुले बालकांना खाऊ वाटप अल्पोपहार दिला जातो तसेच कोपीत रहाणारे सर्वांना वीज पाणी सुरक्षा दिली आहे. ऊस तोडणी मजूरांना सकाळी लवकर उठून ऊस तोडणी साठी जावे लागते त्यांना काम करताना जखम होऊ शकते तेव्हा वेळीच त्यांचे वर उपचार होणे आवश्यक असते अन्यथा धनुर्वात होऊ शकते तसेच सर्दी खोकला ताप यांवर वेळच्या वेळी तपासणी केली तर पुढे आजारांचे स्वरूप वाढत नाही. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सुचनेनुसार या मजूरांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य तपासणी लसीकरण करून त्यांना निरोगी आरोग्य देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे अशी माहिती शिबिरात दिली.
सर्व ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची तपासणी कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे, डॉ प्रमोद पवार यांनी केली. तपासणी नंतर त्यांना कारखान्याचे वतीने मोफत औषधोपचार करुन औषध पुरवली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पोफळे यांनी मजूरांना आरोग्य विषयी अनमोल मार्गदर्शन केले.
मोफत आरोग्य तपासणी उपचार व लसीकरण शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पोफळे, डॉ प्रमोद पवार व शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर, बोर्ड सेक्रेटरी भीमराव बाबर यांच्या शुभ हस्ते कारखान्याचे दैवत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.