शिक्षण आणि संस्कार जीवनाचा पाया आहे.- डॉ.यशवंत कुलकर्णी
श्री चंद्रशेखर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी ‘नृत्य महोत्सव’ अनुभवला.
श्री चंद्रशेखर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या ‘यशोत्सव’, वार्षिक स्नेहसंमेलन,बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी, “शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही आपण आत्मसात केलं, तर जगताना बळ येतं, जगताना यश येतं, आणि जीवना मध्ये यशस्वी जीवनाची गुरु किल्ली मिळते.” असे मनोगत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.
आबासाहेब देशमुख चारिटेबल ट्रस्ट संचलित श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल, मराठी शिशु शाळा या सर्व शैक्षणिक विभागाचे स्नेहसंमेलन 2024 ‘यशोत्सव’ उत्साहात संपन्न झाले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अकलूज पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्वाती सुरवसे मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर बक्षीस वितरण कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब व जयवंत शुगरचे अध्यक्ष संदीप उर्फ चारुदत्त देशपांडे यांच्या शुभहस्ते, विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, परीक्षेमध्ये व शिक्षकांनी वेगळ्या क्षेत्रात पुरस्कार मिळवल्या बद्दल यशोत्सवामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आबासाहेब देशमुख चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ.रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख, संचालक यशराजभैया देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, सचिव भारत कारंडे, कवी नवनाथ खरात, नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, साहेबराव देशमुख, काकासाहेब देशमुख, गटनेते नगरसेवक राहुल रेडे, नगरसेविका शारदा पाटील, नगरसेविका नाझिया पठाण, नगरसेविका तेजश्री लाटे, नगरसेवक प्रकाश नवगिरे, शिवाजी रेडे, नामदेव पाटील, जगदीश इंगळे, मौला पठाण, चंद्रकांत साळुंखे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दोरगे, सहसचिव बाळासाहेब भोसले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, प्रा.शाळा उपाध्यक्ष इम्रान शेख, अश्विनी दोरगे,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य पांडुरंग बनसोडे, मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, हेडमास्टर सुनील सूर्यवंशी, पर्यवेक्षक नवनाथ आधटराव, संस्था पर्यवेक्षक सिताराम गुरव, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुनील गवळी, सर्व शिक्षण संकुलाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक, विद्यार्थी, मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांच्या व संगीताच्या तालावरती नृत्य करून श्रीपूर-महाळुंग पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालकांना मनमुराद आनंद दिला. गेल्या अनेक वर्षापासून चंद्रशेखर विद्यालयाचे स्नेहसंमेलन नेहमीच गाजत असते. यावर्षी शांततेत, शिस्तबद्ध, आनंदी वातावरणामध्ये स्नेहसंमेलन पार पडले. सर्व प्रेक्षकांनी व पालकांनी सप्तरंग कार्यक्रमांमध्ये निवड झालेल्या नृत्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी ‘नृत्य महोत्सव’ अनुभवला.