अकलूज मध्ये GP CON चे आयोजन
अकलूज येथे निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व अकलाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने GP CON चे आयोजन.

अकलूज येथे निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व अकलाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने GP CON चे आयोजन.
अकलूज दि.९ (केदार लोहकरे) अकलूज येथे निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व अकलाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने GP CON चे आयोजन कृष्णप्रिया हाॅल येथे करण्यात आले होते.
अकलाई हॉस्पिटलचे डॉ.शैलेश गायकवाड यांनी डायबेटिस या विषयावरती तर डॉ.सुनिल नरूटे यांनी अस्थमा या विषयावरती मार्गदर्शन केले.दोन्ही विषय जनरल प्रॅक्टिशनर यांना दैनंदिन प्रॅक्टीसमध्ये नक्कीच मार्गदर्शक ठरतील.हा कार्यक्रम निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे भोसले, निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.अंजली कदम व होमिओपॅथी महिला संघटनेच्या अध्यक्षा डॉ.वैष्णवी शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.सदरच्या GP CON कार्यक्रमसाठी माळशिरस तालुक्यातील BAMS व BHMS डॉक्टर्स बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा संघटनेचे डॉ.प्रशांत निंबाळकर यांनी केले.तर सुत्र संचालन निमा संघटनेचे सहसचिव डॉ.दिलिप पवार यांनी केले.डॉ.शैलेश गायकवाड यांची ओळख होमिओपॅथी संघटनेच्या सदस्या डॉ.शुभांगी माने-देशमुख यांनी करून दिली तर डॉ.सुनिल नरूटे यांची ओळख डॉ.दिपाली सर्जे यांनी करून दिली.आभार प्रदर्शन डॉ.आरती पोफळे यांनी केले.