महाराष्ट्र

बसमध्ये तरुणी सोबत, कंडक्टरचे गैरवर्तन | महाळुंग जवळ प्रवासादरम्यान धक्कादायक घटना

महाळुंग जवळ एस.टी. बसमध्ये प्रवासी तरुणी सोबत, कंडक्टरची छेडछाड | अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकलूज-श्रीपूर मार्गावरील बसमध्ये धक्कादायक प्रकार | कंडक्टरने प्रवासी तरुणी सोबत…. महाळुंग जवळ  बस मध्ये घडली घटना

मुली/महिला बस मध्ये प्प्रवास करताना सुरक्षे बाबत गंभीर प्रश्न?

अकलूज (प्रतिनिधी) –  अकलुज हून श्रीपूर कडे एस.टी. बसने फिर्यादी तरुणी प्रवास करत असताना, सदर बस महाळुंग गावाजवळ आली असता, त्याच बसचा कंडक्टर मारुती बबन माने (रा. माळीनगर, ता. माळशिरस) याने फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहिले. तिकीट काढताना आरोपीने फिर्यादीच्या अंगाला हात लावून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही घटना मंगळवार दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी ( शिक्षण घेत असणारी तरुणी ) वय 22, रा. श्रीपूर.

या घटनेनंतर तरुणीने तत्काळ धैर्य दाखवत अकलुज पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. 612/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अकलुज हून श्रीपूर कडे जाणाऱ्या बसमध्ये बस कंडक्टरने गैरवर्तन केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कंडक्टर विरुद्ध बी.एन.एस. कलम 74, 75 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलीसांचा तपास सुरू

फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध कारवाई सुरू असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बस प्रवासात मुली/महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पुढील तपास  पोहेकाँ दर्लिंग गुरव हे करीत आहेत. 

आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा काय होणार.

बी.एन.एस. कलम 74 व 75 अंतर्गत हा गुन्हा संज्ञेय स्वरूपाचा असून दोषी आढळल्यास आरोपीस एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!