अशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिचा गावकऱ्यांकडून भव्य सत्कार
रत्नाईच्या कृषीकन्यांनी केला सुवर्णकन्या ऋतुजा भोसले हिचा भव्य सत्कार

रत्नाईच्या कृषीकन्यांनी केला सुवर्णकन्या ऋतुजा भोसले हिचा भव्य सत्कार
लवंग (ता. माळशिरस) येथील अशियायी क्रीडा स्पर्धेत दुहेरीटेनिसच्या स्पर्धेत ऋतुजा भोसले हिने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर ती पहिल्यांदा आपल्या गावी आली तेव्हा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला . त्यावेळी हलगी, ढोल, लेझीम, तुताऱ्यांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेवरील सराटीपासून लवंगपर्यंत १५ किलोमीटर मिरवणूक काढण्यात आली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वागत तिचे स्वागत केले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज तालुका माळशिरस येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या उत्कर्षा फुले , अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, वैष्णवी सानप यांनी लवंग येथे सुवर्णकन्या ऋतुजा भोसले यांचा रत्नाई कृषि महाविद्यालया तर्फे सत्कार केला.सराटी पुलावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत दुपारी सव्वा तीन वाजता ऋतुजाचे आगमन झाले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत तिचे स्वागत करण्यात आले.
आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, प्रताप पाटील, दत्तात्रय भिलारे, सूर्यकांत शेंडगे, गणपत भोसले, विक्रम भोसले, निशांत पाटील, गणेश इंगळे, राजेंद्र घोगरे, उत्तमराव भिलारे, माजी उपसरपंच मधुकर वाघ आदी उपस्थित होते.