महाराष्ट्र

दत्तात्रय(दादा) भिमराव मुंडफणे यांचे निधन | बातमी कळताच सर्वांना दुःखाचा धक्का

महाळुंग-श्रीपूर परिसरावरती शोककळा 

महाळुंग-श्रीपूर परिसरावरती शोककळा 

31 ऑगस्ट रोजी अपघात, 1 सप्टेंबर रोजी अकलूज मध्ये शस्त्रक्रिया, 14 सप्टेंबर उपचारादरम्यान पुणे रुबी हॉस्पिटल मध्ये मृत्यू

महाळुंग : दत्तात्रय(दादा) भिमराव मुंडफणे वय 40 वर्ष,  यांचे पुण्यामध्ये उपचारादरम्यान रुबी हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई,  पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  ते प्रगतशील बागायतदार म्हणून महाळुंग-श्रीपूर आणि परिसरामध्ये ओळखले जात होते. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व तरुण वयामध्ये निघून गेल्यामुळे सर्व परिसरावरती शोककळा पसरली आहे. सोशल मीडिया वरती ही बातमी कळताच सर्वांना दुःखाचा धक्का बसला.  ते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे यांचे चुलत बंधू होते.

31 ऑगस्ट रोजी त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या छातीला दुखापत झालेली होती.  त्यांच्यावरती अकलूज मधील अश्विनी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु काही दिवसांनी परत त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना दोन दिवसापूर्वी रुबी हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट करण्यात आले होते.  परंतु उपचारादरम्यान बीपी लो झाल्यामुळे त्यांचा मृत्यू  झाल्याचे समजले.  सायंकाळी महाळुंग मुंडफणे वस्ती येथे त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!