आ.प्रशांतराव परिचारक, एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पंढरी तीर्थक्षेत्र नगरामध्ये समाजसेवेचा वसा आणि वारसा लाभलेले परिचारक कुटुंब आणि श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी अविरत सेवेचे घेतलेले व्रत यामुळे पंढरपूर तालुका व शहरांमध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचारक कुटुंबाला एक आदराचे स्थान आहे.
माझे वडील कै शंकरराव खुळे अण्णा यांना पण राजकीय व समाजकार्याची आवड होती. खरेदी विक्री संघ पंढरपूरचे ते अध्यक्ष होते. सुरुवातीपासूनच त्यांचाही स्वभाव आक्रमक कडक आणि स्पष्ट वक्ते असा होता. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांना आमदार करायचेच या जिद्दीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर मराठा व बहुजन समाजातील अनेक दिग्गज कार्यकर्ते होते. खर्डीचे श्रीधर रोंगे बोहाळीचे बाबुराव जाधव, रामभाऊ बागल, रामभाऊ निराळी, भास्कर आप्पा गायकवाड, यांच्यासह पंढरपूर शहरातील अनेक जुने सहकारी होते. 1978 वेळी मोठ्या मालकांचा पराभव झाला पण ही सर्व जुनी मंडळी हिम्मत हारले नाहीत. त्यांनी जिद्दीने मोठ्या मालकांना पंढरपूरचे आमदार करून दाखविले ते पुढे अनेक वर्षे मोठ्या मालकांना आमदार करीतच राहिले.
1985 मध्ये आजचे युवकांचे प्रेरणास्थान प्रशांतराव यांना कॉलेजचे विद्यापीठ प्रतिनिधी ते खर्डी चे सरपंच पासून आत्तापर्यंत त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची संधी मलाही मिळाली. जसे खुळे अण्णा तसाच मी, आणि माझ्यासह अनेक युवक कार्यकर्ते प्रशांतराव यांच्या राजकारणाने गरुड झेप घ्यावी या जिद्द्याने त्यांच्या सोबतीला आहेत.
1997 पासून प्रशांतराव परिचारक युवा मंचच्या माध्यमातून मी व माझे अनेक सहकारी परिचारक कुटुंबाचे राजकीय बळ वाढावे यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. माझ्यासारखे ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते प्रशांतराव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदापासून सोसायटी चेअरमन असेल झेडपी,पंचायत समिती, मार्केट कमिटी ,कारखाना संचालक, पर्यंत अनेक पदे त्यांना देऊन सन्मानित केले आहे.
राजकारणात ते कधीही कार्यकर्त्यांना द्वेषाने न वागवता सन्मानाने वागवतात. म्हणूनच आज तरुण पिढी व युवकां चे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यापैकीच मी एक आहे. मलाही श्रद्धेय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी माननीय प्रशांत मालक यांनी दिली. हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी फार मोठा बहुमान आहे .त्यांनी मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली उमा महाविद्यालय, कर्मयोगी कॉलेज शेळवे, कर्मयोगी शांतिनिकेतन स्कूल पंढरपूर, पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर, कर्मयोगी पतसंस्था अशा अनेक संस्था स्थापन करून तरुण व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज पांडुरंग परिवारामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये 5000 चे वर युवक तरुण कामगार व महिला कामगार भगिनींचा समावेश आहे. ते स्पष्ट बोलणारे वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी तालुक्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते निर्माण करून एक युवकांची फळी तयार केली आहे. त्यांच्या विचाराची, समाजकार्याची आज पंढरपूर शहर व तालुक्याला गरज आहे. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते मजबूत करण्यात आलेले आहेत. शहरात झालेला विकास हा त्यांच्याच दूरदृष्टीतून व प्रयत्नातून होत आहे. आज प्रशांत मालकांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने अशी अनेक कामे त्यांच्या हातून इथून पुढेही व्हावीत त्यांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभावे अशी ईश्वर पांडुरंग चरणी प्रार्थना.- श्री कैलास शंकरराव खुळे, व्हा चेअरमन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह सा का, श्रीपुर