महाराष्ट्र

डीजे डॉल्बी लावल्यास कारवाई होणारच.- पी.आय. भानुदास निंभोरे | SOLAPUR | No Dj No Dolby Movement उपक्रम

श्रीपूर | गणेशउत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न | डी.जे. डॉल्बीला परवानगी नाही

आवाज वाढवू नको डीजे – एस.पी. साहेबांचा आदेश हाय रं… गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

श्रीपूर मध्ये गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्रीपूर ऑट पोस्ट पोलीस स्टेशन कडून आगामी काळात दिनांक 07/09/2024 ते दिनांक 17/09/2024 या कालावधीत श्रीगणेश उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने अकलूज पोलीस ठाणे यांचे वतीने श्रीपूर पूर्व भागातील सर्व गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, शांतता कमिटी सदस्य, श्रीपूर पूर्व भागातील सर्व पोलीस पाटील दक्षता समिती सदस्य, गणेशमुर्ती विक्रेते, जेष्ट नागरीक यांची बुधवारी सायंकाळी श्रीपूर पोलीस चौकी मध्ये शांतता कमिटी बैठक घेण्यात आली.

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांच्या आदेशानुसार गणपती विसर्जन मिरवणुकीत व इतर सण उत्सवामध्ये डीजे डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही. तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तालुक्यातील, जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील सर्व डीजे डॉल्बी मालकांना अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. अशी माहिती मार्गदर्शन करताना अकलूज पोलीस स्टेशनचे पीआय भानुदास निंभोरे यांनी दिली. 

सदर बैठकीमध्ये अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, श्रीपूर पोलीस चौकीचे सपोनि योगेश लंगुटे, ए.एस.आय. बाळासाहेब पानसरे,  गोपनीय विभागाचे पोलीस शिवकुमार मदभावी, हवालदार किशोर गायकवाड, पत्रकार दत्तात्रय नाईकनवरे,  पूर्व भागातील सर्व पोलीस पाटील,  गणपती मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी घेणेबाबत, डॉल्बी, डी.जे. न वाजवता पारंपारीक वाद्य वाजवुन प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करणेबाबत, सामजिक तेढ निर्माण करणारे देखावे सादर न करणेबाबत, गणेश मुर्तीचे पावित्र्य राखण्याचे अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करुन गणेश उत्सव मंडळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविणेबाबत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रितीने मुर्ती स्थापना करणेबाबत, तसेच जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट गणपती, उत्कृष्ट समाजउपयोगी देखावा याबाबत शासन स्तरावर असलेले बक्षीस योजनेबाबत व अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धेमध्ये सहभाग घेणे बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सदरची शांतता कमिटी बैठक सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सो., अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सो., उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सो. यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीला बंदी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!