संत गाडगेबाबा यांची जयंती श्रीपूर-महाळुंग परिसरामध्ये उत्साहात साजरी
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती केली साजरी

किर्तनाने मन आणि झाडूने परिसर स्वच्छ करणारे राष्ट्रीय संत गाडगे महाराजांची जयंती श्रीपूर-महाळुंग परिसरामध्ये उत्साहात साजरी
श्रीपूर तालुका माळशिरस येथे, राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा प्रतिष्ठान श्रीपूर-महाळुंग यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडून थोर समाज सुधारक, कीर्तनकार राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून, आतिषबाजी करत व फटाक्यांच्या तोफाची सलामी देत, हलगीच्या कडकडाटामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पूर्व भागातील आदर्श व्यक्तिमत्व अविदादा इनामदार, उबाठा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेवनाना वाघमारे, श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे, गटनेते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, नगरसेवक निनाद पटवर्धन, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, संस्थापक-अध्यक्ष मोहसीन पठाण, सुरेशअप्पा गुंड-पाटील, सामाजिक कार्यकर्ते अल्लाबक्ष शेख, पैलवान अशोक चव्हाण, मौलाच्याच्या पठाण, विक्रमसिंह लाटे, RPI माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, मा जि प सदस्या अरुण तोडकर नगरसेवक, मा जि प सदस्य सुहास गाडे, संचालक सागर यादव, प्रा.नरेंद्र भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवमराव गायकवाड, संजय खरे, बाळू भोसले, तेजस रेडे, माजी मुख्याध्यापक दादासाहेब गाडेसर, शहराध्यक्ष गणेश सावंत, दादा लाटे, अमरसिंह पिसाळ-देशमुख, राहुलआबा जगताप, बोरगाव ग्रामपंचायत सदस्य दिलीप मंडवळे, विश्वास भालशंकर, जांभूड ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल खटके, डॉ.सुहास बनसोडे, राजकुमार रेडे, बापू रेडे, राजू गायकवाड, इंजिनीयर चंद्रशेखर मोकाशी, रशीद मुलानी, संजय भाग्यवंत पश्चिम महाराष्ट्र संघटक, अनिल मुंडफणे, नितीन जाधव, अजय काळेल, समाधान भोसले, बजरंग भोसले, मौला डांगेसर, देविदास काळे, रोहित काळे, रमेश देवकर, ज्ञानेश्वर सुरवसे, एडवोकेट बाबर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सावंत साहेब, आसिफ शेख, इमरान शेख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर माने, गणेश कारंडे, मंगेश कारंडे, नागेश साळुंखे, सदाशिव पवार, पृथ्वीराज कारंडे, लखन कारंडे, दादा कारंडे, महेश पवार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.