
जीवित हानी नाही
महाळुंग तालुका माळशिरस येथील बाबरी पूल या ठिकाणी सोमवारी सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली होती. सर्व आंबेडकर जनता, महिला, पुरुष, लहान, थोर मिरवणुकी मध्ये सामील झाले होते. याच वेळेला शारदाबाई जगन्नाथ सरतापे यांच्या घराला रात्री नऊ चे सुमारास अचानक आग लागली आणि त्यांचे घर, सर्व संसार, घरातील साहित्य जळून राख झाले. काहीही वाचवता आले नाहीत. जीवित हानी झाली नाही. घरामध्ये कोणीही नव्हते.
शारदाबाई यांचे 70 वर्षे वय आहे. त्यांना मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा त्यांचा परिवार एकत्रित राहत होता. जवळपास घर आणि घरातील साहित्य मिळून दोन अडीच लाख रुपयांचे त्यांचे नुकसान झालेले आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला परत उभारी येण्यासाठी आर्थिक मदत व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.