आईच्या स्मृतीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदान – वत्सलाबाई लोंढे पुण्यस्मरण दिनी शैक्षणिक साहित्य वाटप
गौतम लोंढे यांचा आगळावेगळा उपक्रम : आईच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

ज्ञानार्जनासाठी हातभार – गौतम लोंढे कुटुंबीयांचा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील गौतम शंकर लोंढे यांनी आपल्या मातोश्री सौ.वत्सलाबाई शंकर लोंढे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीपूर महाळुंग येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रंगपेट्या आदी साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व पालकांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कालकथीत वत्सलाबाई लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, गटनेते नगरसेवक राहुल रेडे, नगरसेवक नामदेव इंगळे, नगरसेवक प्रकाश नवगिरे, RPI ज्येष्ठ नेते भारतनाना आठवले, डॉ.सुहास बनसोडे, पत्रकार बी. टी. शिवशरण, प्रकाश केसकर, शहराध्यक्ष गणेश सावंत, शंकर लोंढे, रमेश लोंढे, वाळेकर, प्रताप लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुनील पवळ सर व सहशिक्षिका राजगुरू मॅडम यांनी कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले. यावेळी भारत आठवले, मिलिंद सरतापे, डॉ.सुहास बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करून. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले. या उपक्रमाद्वारे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबरोबरच आईच्या स्मृतींना योग्य अशी मानवंदना दिल्याचे समाधान गौतम लोंढे यांनी व्यक्त केले.