शिवकन्या तोडकरच्या नृत्याने रंगणार बोरगाव दहीहंडी उत्सव | रणजीत साठे
रणजीत भाऊ साठे युवा मंचतर्फे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन

बोरगावमध्ये रविवारी दहीहंडी उत्सव – विजेत्यांसाठी तब्बल ५५,५५५ रुपये बक्षीस
बोरगावमध्ये दहीहंडी सोहळा – ऑडिओ, लाईटिंग आणि नृत्य सादरीकरणाचे खास आकर्षण
बोरगावमध्ये रविवारी भव्य दहीहंडी उत्सव
बोरगाव (ता. माळशिरस) येथे रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता कै. अर्जुन भजनदास साठे सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि रणजीत भाऊ साठे युवा मंच, बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कै.मोहनराव पाटील भवन बोरगावच्या प्रांगणामध्ये रविवार सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे.
या उत्सवाचे खास आकर्षण सुप्रसिद्ध नृत्यांगना शिवकन्या तोडकर हिचे नृत्य सादरीकरण असणार आहे. त्याच बरोबर विराज सेव्हन टू ऑडिओचा आवाज आणि एस एम लाइटिंगची भव्य सजावट हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवात विजेत्या गोविंदा पथकासाठी ५५,५५५ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले असून, तालुक्यातील नामवंत गोविंदा पथकांचा सहभाग अपेक्षित आहे. स्थानिक व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असल्याची माहिती आयोजक रणजीत साठे यांनी दिली.