महाराष्ट्र

पांडुरंग कारखाना प्रामाणिकतेचा आदर्श मॉडेल आहे – फडणवीसांचे कौतुक

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

सीबीजी प्रकल्पासाठी पांडुरंग कारखाना केंद्राच्या योजनेत समाविष्ट करू – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

संपादक इन महाराष्ट्र न्यूज : दत्ता नाईकनवरे
श्रीपूर तालुका माळशिरस येथे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील तपस्वी नेते व जनसेवक कर्मयोगी सुधाकरपंत (मोठे मालक) परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे आणि पोटॅश खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रम स्थळावरून ऑनलाईन  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत परिचारक होते. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार अभिजीत पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, राजन पाटील, उत्तमराव जाणकर, समाधान अवताडे, राम सातपुते,  रणजीतसिंह नाईक-निंबाळकर,नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पांडुरंग परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला.

यावेळी प्रास्ताविकात प्रशांत परिचारक यांनी या प्रसंगी मोठ्या मालकांच्या कार्याचा भावपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की,“मोठे मालक निस्पृह होते, ब्रह्मचारी राहिले, पण समाजासाठी तन-मन-धन अर्पण केले. त्यांनी स्वतःचा प्रपंच केला नाही, पण समाजाचा प्रपंच उभा केला.” ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्यासाठी नेहमीच पाठीशी उभे राहिले आहेत. सत्तेत असो वा नसू, त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला. मोठ्या मालकांनी ७८ साली जनता पक्षात पहिली निवडणूक लढवली आणि मागे वळून पाहिले नाही. त्यांनी कार्यकर्ते घडवले, संघटना बांधली आणि सहकाराला नवा जीव दिला.”

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन आणि कै.सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, “मोठे मालक हे नावाने नाही तर कर्माने मोठे होते. त्यांची सत्ता समाजाच्या मना-मनावर आहे. त्यांनी जे प्रेम कमावले, तेच त्यांची खरी संपत्ती आहे.”

ते पुढे म्हणाले, “सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि समाजासाठी कार्य हेच मोठ्या मालकांचे खरे ब्रीद होते. त्यांच्या जीवनातील ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ या गीतेच्या उक्तीचा ते जिवंत आदर्श होते.” मुख्यमंत्र्यांनी कारखान्याच्या कार्याचे कौतुक करत पांडुरंग कारखाना सीबीजी (Compressed Bio Gas) प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून निवड व्हावी यासाठी अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं.

शेतकऱ्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींच्या मदत पॅकेजची माहिती दिली. तसेच पांडुरंग परिवाराने दिलेल्या मदतीचे कौतुक करत “सरकार काम करतं, पण समाजही त्यात हातभार लावतो, हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. “मोठ्या मालकांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी समर्पित राहूया,” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!