महाराष्ट्र

श्रीपूर-महाळुंग मध्ये महामानवाला अभिवादन

परिसरात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

परिसरात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

श्रीपूर प्रतिनिधी : भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशेतेहतीस वी जयंती श्रीपूर परिसरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली आज सकाळी नऊ वाजता श्रीपूर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्यास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन रामचंद्र सावंत पाटील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी व्हा चेअरमन अँड प्रकाशराव पाटील महाळुंग श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील महाळुंग श्रीपूर नगरपंचायत गटनेते राहुल रेडे पाटील नगरसेवक सोमनाथ मुंडफणे नगरसेवक तानाजी भगत नगरसेवक नामदेव इंगळे प्रमुख वक्ते अँड अविनाश काले  माजी उपसभापती प्रतापराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव मौला पठाण राजेंद्र वाळेकर आरपीआय चे नेते शामराव भोसले ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसटलरी चे उत्पादन व्यवस्थापक नरेश पाठक जनरल मॅनेजर चंद्रकांत भागवत  अरगडे साहेब इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमास सकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले  जयंती उत्सव समिती श्रीपूर चे माजी अध्यक्ष बुध्द वासी भरत बनसोडे यांचे स्मरणार्थ प्रमुख पाहुण्यांना संविधान प्रती भेट म्हणून दिल्या तसेच परिवर्तन प्रतिष्ठान चे शैलेश साबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ धैर्यशील मोहिते पाटील व उपस्थित पाहुण्यांना भेट देण्यात आले.

सदर जयंती निमित्ताने अँड अविनाश काले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहितांना सर्वधर्मसमभाव याचा अंतर्भाव असणारे सामाजिक सलोखा बंधुभाव वाढीसाठी  प्रयत्न केले आहेत प्रत्येकाला  आपापल्या जातीधर्माच्या रुढी परंपरा पाळण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत आहे यावेळी रामचंद्र सावंत पाटील व अँड प्रकाशराव पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले अँड प्रकाशराव पाटील यांनी सांगितले की शिक्षणाने माणूस परिपूर्ण होतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहितांना सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व विश्वात साजरी केली जाते चांगुलपणा आदर्श यामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध झाल्या आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती श्रीपूर यांचे पदाधिकारी यांनी जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न केले बोरगाव येथील लहान मुले मुली यांनी संगीताच्या तालावर आकर्षक लेझीम नृत्य सादर केले लेझीम नृत्य पहाण्यासाठी श्रीपूर परिसरातील असंख्य नागरिक आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वजीत भालशंकर जालिंदर खरात संदिप घाडगे बापू पोळके राजकुमार सुरवसे रमेश भोसले गणेश सावंत कपिल घाडगे संजय खरे बी टी शिवशरण तुकाराम बाबर समाधान लांडगे तुकाराम बाबर गौतम आठवले अनिल दळवी नागेश काटे दावल शिवशरण राजू नवगीरे विशाल जगधने नितीन आठवले तेजस बाबर महेश रणपिसे इत्यादी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!