महाराष्ट्र

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे

अजमेर शरीफ दर्गाहचे डॉ.पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांचे प्रतिपादन.

संग्रामनगर (संजय लोहकरे) परमपूज्य राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी आध्यात्मिक कार्याबरोबरच समता,विश्व बंधुत्व आणि सदाचरण केंद्रबिंदू मानून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कार्य दीप स्तंभासारखे आहे.त्यांच्या कार्याचा वारसा संवर्धित करण्यासाठी सर्वांनी कालबद्ध योगदान द्यावे,असे आवाहन अजमेर शरीफ दर्गाहचे डॉ.पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांनी केले.

इंदापूर येथील श्री दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट आश्रमात भय्युजी महाराज यांच्या भक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हरीश पाटील,हिंजवडीचे उद्योजक सूर्यकांत साखरे पाटील,राजेंद्र पवार,प्रदीप पवार,सुनील बनसुडे,तैय्यब शेख,सलीम बागवान,अंगद तावरे,डॉ. संतोष नगरे,सतीश कस्तुरे,दिपक चौधरी,सुभाष पानसरे उपस्थित होते.यावेळी डॉ.उस्मानी यांचा शुभहस्ते दिलीप वाघमारे तर इंदापूर आश्रमासाठी जागा दिलेले गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी म्हणाले की,भय्यूजी महाराज यांनी पर्यावरण संतुलन, दुष्काळ निवारण करण्यासाठी गाव तिथे तळे,गरीब मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती,शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपक्रम,एचआयव्ही बाधित युवापिढीसाठी आश्रम, मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी प्रकल्प,मुलींची लग्ने भरीव योगदान दिले आहे. इंदापूर भक्तांच्या आग्रहास्तव आपण इंदापूर गुरुपौर्णिमा उत्सवासाठी निश्चित येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी डॉ.प्रशांत देशमुख म्हणाले,भारतातील विविध शहरांत त्यांनी विविध धर्मपंथांच्या धार्मिक,सार्वजनिक, सामाजिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करून भारतीय संस्कृती संवर्धित केली.त्यांनी जगाला प्रेम,सद्भावना,शांती व मानवतेचा संदेश दिला.त्यामुळे गुरुसेवा व गुरुतत्व केंद्रबिंदू मानून सर्वांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे चालवावे, आवाहन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत बसवेश्वर लंगोटे,अनिल परदेशी यांनी तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरुण चव्हाण यांनी केले.शेवटी आभार दिलीप वाघमारे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!