विकसित कृषी भारत रथ अभियान शेतकऱ्यांना सक्षम बनविणार-डॉ.स्वाती कदम
विकसित कृषी भारत रथयात्रे निमित्त कृषी शास्त्रज्ञांची लवंग गावाला भेट

केळीतील (बंची टॉप) पर्णगुच्छ विषाणू रोग टाळण्यासाठी करा मावा नियंत्रण- डॉ. बसवराज रायगोंड
लवंग तालुका माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग माळशिरस, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर व भरड धान्य केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी भारत रथ निमित्ताने शास्त्रज्ञांनी लवंग गावी भेट दिली. या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे “विकसित कृषी भारत रथ” कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचा हा एक भाग आहे. या मोहिमेत “कृषी रथ” शेतकऱ्यांना शेतीचे प्रगत तंत्र, नवीन वाण आणि कृषी विपणनाची माहिती देण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ लवंग तालुका माळशिरस गावामध्ये आले होते.
यावेळी डॉ.बसवराज रायगोंड यांनी केळी पिकातील बनचे टॉप विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मावा चे नियंत्रण लोकांना आवाहन केले. त्या अनुषंगाने लवंग गावच्या शेतकरी बांधवांनी ऊसातील गवताळ वाढ नियंत्रण व आंबा पिकातील मोहर गळ या संदर्भातील उपाययोजना उत्साहाने जाणून घेतल्या.
डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पाचट व्यवस्थापन तूर शेंडा खुडनी व बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना अवगत केले. आणि विकसित कृषी भारत रथ अभियान शेतकऱ्यांना सक्षम बनवणार व या अभियाना विषय अधिक माहिती डॉ.स्वाती कदम यांनी लवंग मधील शेतकऱ्यांना दिली. तसेच डॉ.पिंकी रायगोंड मॅडम यांनी पिकातील मर रोग व त्यावरील उपाय योजने विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ .विशाल वैरागर यांनी जलतारा योजने चा लाभ घेण्याचे आवाहन केले गावातील शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तानाजी वाळकुंडे यांनी केले. तसेच दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी व उपाय योजनेवर चर्चा केली.या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील डॉ सूरज मिसाळ यांनी सत्कार समारंभ आयोजित केला. तसेच गावकऱ्यांना सध्य परिस्थिती व हवामान बदल याविषयी माहिती दिली. तुषार अहिरे व समस्त कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी तसेच कृषी विभागातील रामराजे कोकाटे सहाय्यक कृषि अधिकारी, व लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच .भिलारे ,पोलिस पाटील विक्रम भोसले व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
विकसित कृषी भारत रथ अभियानाचे प्रमुख हेतू:
- शेतकरी सक्षमीकरण:
ही मोहीम शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करते, त्यांना अधिक उत्पादकता आणि नफा मिळविण्यास सक्षम बनवते. - नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार:
कृषी रथ शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रांची ओळख करून देतो, जसे की अचूक शेती, स्मार्ट शेती आणि सेंद्रिय शेती. - उत्तम कृषी पद्धतींचा प्रचार:
ही मोहीम शेतकऱ्यांना उत्तम बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या वापराबाबत शिक्षित करते, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढते. - मार्केटमध्ये प्रवेश:
कृषी रथ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी मार्केटिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देतो जेणेकरून त्यांना वाजवी किंमत मिळू शकेल. - सरकारी योजनांची माहिती :
या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल.
विकास कृषी भारत रथ अभियान हे भारताच्या कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही मोहीम शेतकऱ्यांना नवीनतम तंत्रज्ञान, उत्तम कृषी पद्धती आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करते.