महाराष्ट्र विकास सेना पक्ष शाखेचे माळखांबी मध्ये उदघाटन
माळखांबी येथे मविसेच्या शाखेचे उदघाटन

तालुका उपाध्यक्षपदी बिभीषण साठे तर शहर अध्यक्षपदी सतीश साठे
माळखांबी ता.माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे अनावरण करण्यात आले.यावेळी मविसे प्रदेश सचिव अनिल साठे,राज्य समन्वयक अजित साठे,तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे,माळखांबी शाखा अध्यक्ष सतीश साठे,माजी सरपंच रामचंद्र साठे,माजी सरपंच धोंडीराम साठे,श्रीमंत भगत,कुंडलिक साठे,अभिमान साठे,तानाजी साठे,मोहन साठे,बबलू खंडागळे, संतोष शेळके,शहाजी साठे,नारायण साठे,बाळासाहेब साठे,मारुती साठे,महादेव साठे,हनुमंत साठे,लखन साठे,शिवाजी साठे उपस्थित होते.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी बिभीषण साठे यांची तर माळखांबी शहर अध्यक्षपदी सतीश आप्पा साठे यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले.