महाराष्ट्र

अकरावीच्या प्रवेशासाठी गेलेला ओम मुंडफणे बेपत्ता | परिसरात चिंतेचे वातावरण

महाळुंग चौकी हद्दीतील विद्यार्थी बेपत्ता; नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू

ओम मुंडफणे बेपत्ता | घरच्यांची अकलूज पोलिसांत धाव

श्रीपूर, ता. माळशिरस : श्रीपूर परिसरातील महाळुंग चौकी हद्दीतील ओम नानासाहेब मुंडफणे (वय १५) हा मुलगा मंगळवार दि. २६ मे रोजी सकाळी अकरावीच्या प्रवेशासाठी श्रीपूर येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र तो कॉलेजमध्ये पोहोचलाच नसल्याचे समोर आले असून अद्याप घरी परतला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओम हा दहावी उत्तीर्ण विद्यार्थी असून पुढील शिक्षणासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. दुपारी सुमारे दीड वाजेपर्यंत तो घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी तसेच परिचितांकडे चौकशी केली असता त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

यानंतर बुधवारी सकाळी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये ओम मुंडफणे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचा फोटो व माहिती प्रसारित करून नागरिकांना शोधासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

ओमचे वर्णन असे : सडपातळ व उंच बांधा, अंदाजे उंची ५ फूट, रंग गोरा. वरील वर्णनातील मुलगा कोणाला दिसून आल्यास तात्काळ पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे.

संपर्क क्रमांक :
अनिल शिवराम मुंडफणे – ९५८८४९५६१२
आर्यन नानासो मुंडफणे – ८०८०६०३८११

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!