महाराष्ट्र

माळीनगर पंचवटी येथे भीषण अपघात | नॅशनल हायवेवर दुचाकी व कारची धडक; दोघे गंभीर जखमी

अकलूज पोलिसांची तत्पर कारवाई; जखमींना रुग्णालयात दाखल

भरधाव वेगामुळे अपघाताची शक्यता? पंचवटी परिसरात खळबळ

माळीनगर (ता. माळशिरस) : माळीनगर येथील पंचवटी येथून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील नॅशनल हायवेवर दुचाकी (Hero कंपनीची) आणि स्विफ्ट कार (MH 12 VZ 7792) यांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. तर स्विफ्ट कारचा पुढचा भाग चुराडा झाला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भरधाव वेग, निष्काळजीपणा किंवा अचानक समोर आलेल्या वाहनामुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकलूज पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पंचवटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी नॅशनल हायवेवर वेग मर्यादा पाळावी व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!