महाराष्ट्र

अकलूजमध्ये महिला दिन उत्साहात; डॉ. रेवती राणे यांचे महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन

अकलूजमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन व विद्यार्थिनींचा सत्कार

अकलूज  (केदार लोहकरे):
अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अकलूज येथील राणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ व वंध्यत्व चिकित्सा तज्ज्ञ डॉ. रेवती राणे आणि माळशिरस पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ. निशा गिरमे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. रेवती राणे यांनी विद्यार्थिनींना पावरपॉईंटच्या माध्यमातून महिलांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कसे जपावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिला दिनाची यंदाची थीम व पोझ विद्यार्थिनींना सांगत महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे किती आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला.

सौ. निशा गिरमे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्रीत्वाशी संबंधित असलेले मूलभूत गुण ही निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे. या गुणांचे जतन व संवर्धन करत शिक्षणाच्या बळावर मुलींनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील अनेक कर्तृत्ववान विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थिनी कु. धनश्री दुपडे यांची आरटीओ अकलूज येथे सेंटर मॅनेजर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत क्रमांक मिळविलेल्या कु. स्वप्नाली गुंड यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीच्या विद्यापीठ युवा महोत्सवात निबंध, वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. अमृता मगरकु. आर्या तेरखेडकर यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास संक्षिप्तपणे सांगितला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित घाडगे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी स्वावलंबी बनून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. नेहा गायकवाडकु. संस्कृती गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. किरण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन तृतीय वर्षाच्या “रत्नाई ग्रुप”ने केले होते. महिला दिनाच्या कार्यक्रमाची संकल्पना महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व सर्व सदस्यांनी मांडली होती.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दत्ता नाईकनवरे (संपादक) In Maharashtra News

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!