महाराष्ट्र

अकलूजसह पाच केंद्रांवर १००% मतदान, उत्तर सोलापुरात ९८.९४% प्रतिसाद

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; पाच केंद्रांवर शंभर टक्के प्रतिसाद

IN MAHARASHTRA NEWS PORTAL

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ९९.६८ टक्के विक्रमी मतदान

सोलापूर : सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (१८ जून) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ९९.६८ टक्के मतदानाची नोंद झाली.

निवडणुकीसाठी एकूण ६१६ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ दोन मतदार मतदानापासून दूर राहिल्याने जिल्ह्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

कुर्डूवाडी, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. तर उत्तर सोलापूर केंद्रावर १८८ पैकी १८६ मतदारांनी मतदान करून ९८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उमेदवार, समर्थक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थित होते. प्रशासनाच्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत आणि शांततेत पार पडली.

तालुकानिहाय मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :

कुर्डूवाडी – ८० पैकी ८० (१००%)
उत्तर सोलापूर – १८८ पैकी १८६ (९८.९४%)
दक्षिण सोलापूर – ८९ पैकी ८९ (१००%)
पंढरपूर – १०० पैकी १०० (१००%)
मंगळवेढा – ६२ पैकी ६२ (१००%)
अकलूज – ९७ पैकी ९७ (१००%)

एकूण : ६१६ पैकी ६१४ मतदान (९९.६८%)

मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!