महाराष्ट्र

श्रीपूर नॅशनल हायवे ९६५G वर मोठा अपघात; बोलोरो पिकपचा चालक जखमी

श्रीपूर | छत्रपती संभाजी महाराज ब्रिज (शहीद निवृत्ती नगर) वरील हायवेच्या पुलावर अपघात, पिकपचे मोठे नुकसान

रात्रीच्या सुमारास हायवेवर पाठीमागून धडक; ऊस ट्रॉली व पिकपचे नुकसान

श्रीपूर : नॅशनल हायवे ९६५G वर श्रीपूर येथील छत्रपती संभाजी महाराज ब्रिज (शहीद निवृत्ती नगर) वरील पुलावर शनिवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असलेल्या बजाट ट्रॉलीला बोलोरो पिकपने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ट्रॅक्टरच्या मागील बजाट ट्रॉलीचे नुकसान झाले असून बोलोरो पिकपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकपचा चालक या अपघातात जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!