महाराष्ट्र

श्रीपूरकरांसाठी आनंदाची बातमी | धुळखात पडलेला बसथांबा पुन्हा सुरू

प्रकाश नवगिरे यांच्या पुढाकारातून श्रीपूरमध्ये बससेवा सुलभ

अकलूज-श्रीपूर-पंढरपूर मार्गावरील प्रवास झाला सोपा

श्रीपूर (ता. माळशिरस) : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नव्याने बसथांबा सुरू करण्यात आल्याने परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून धुळखात पडून असलेला हा बसथांबा आता पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीपूर व परिसरात बसथांबा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात, पावसात उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत होती. चौकात होणारी गर्दी, वाहतुकीची अडचण आणि प्रवाशांचा होणारा त्रास लक्षात घेऊन नगरसेवक प्रकाश नवगिरे व डॉ.सुहास बनसोडे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. अकलूज एसटी आगाराशी संपर्क साधून अखेर या बसथांब्याला पुन्हा सुरूवात करण्यात आली.

या बसथांब्याचे उद्घाटन बस चालक आबा गोसावी व वाहक संगीता बिराजदार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक प्रकाश नवगिरे, डॉ सुहास बनसोडे, माजी वाहन निरीक्षक अनिल दळवी, विष्णु माने सर, माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे सर, एसटी चे माजी कर्मचारी अशोक गाडे, नवनाथ लोखंडे सर, प्रकाश खंडागळे, पांडुरंग चव्हाण, आनंद ताकतोडे, भीमराव भाग्यवंत, बी टी शिवशरण, प्रकाश केसकर, शांतीलाल रेडे, सदा पवार, लखन धुमाळ, मुख्याध्यापक दत्तात्रय हाके, औदुंबर यादव, जयंत भोसले, ज्ञानेश्वर काटे, आर.जी.शिंदे सर, प्रविण कुंभार, सुनिल सुरवसे, गुडुलाल शेख, राजू गुजले, अजित तांबोळी, अनिल कांबळे कलाकार-पेंटर व एसटीचे माजी कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या बसथांब्यावर आता पंढरपूर, बोरगाव, जांबूड, माळखांबी आणि नेवरे या मार्गावरील एसटी बसेस नियमित थांबणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

सदर बसथांब्याची रंगरंगोटी व अक्षर पेंटिंग नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी स्वखर्चाने केली आहे. तसेच अकलूज डेपोशी पत्रव्यवहार करून पहाटेची मुंबई बस सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून लवकरच अकलूज- श्रीपूर मार्गे अक्कलकोट बससेवाही सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विष्णु माने यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!