महाराष्ट्र

आंघोळीचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग | Akluj Police | आरोपी जेरबंद

सोशल मीडियाचा गैरवापर: बदनामीच्या भीतीने महिलेवर अत्याचार,

अकलूज (प्रतिनिधी): सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी गिरझणी येथील विकास सोसायटीचा कर्मचारी उमेश साठे याला अकलूज पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन 2024 मध्ये संबंधित महिला आंघोळ करत असताना आरोपीने तिचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. भीतीपोटी गप्प राहिलेल्या महिलेवर आरोपीने वारंवार अत्याचार करत तिला ब्लॅकमेल केले.

तातडीने अटक : तपास सुरू- पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेण्यात  आले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  आरोपीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत का? याचा तपास अकलूज पोलीस करत आहेत.

दरम्यान, पीडितेच्या पतीला संशय आल्याने त्याने पत्नीला विचारणा केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर तात्काळ अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टिंगले करत आहेत.

⚖️ दुहेरी नोकरीचा मुद्दा चर्चेत

या घटनेसोबतच आरोपी उमेश साठे हा गिरझणी ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क म्हणून कायम कर्मचारी असताना, त्याचवेळी गिरझणी विकास सोसायटीमध्ये शिपाई म्हणूनही काम करत असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी नोकरी करून दोन्हीकडून पगार घेत असल्याचा संशय व्यक्त होत असून, हा प्रकार शासनाची फसवणूक असल्याची चर्चा सुरू आहे.

“एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोकरी कशी? आणि पगार कोण देतो?”
या प्रश्नामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून संबंधित विभागांकडून अधिक तपासाची गरज व्यक्त केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!