महाराष्ट्र

वाढदिवसाचे औचित्य साधून लावलेली झाडे आज देतायत जीवाला सावली!”

“उन्हात दिलासा देणारी हिरवाई – श्रीपूर-अकलूज रोडवर झाडांची बहार”

“वृक्षारोपण” पेक्षा “वृक्षसंवर्धन” हेच खरे यश आहे.

“श्रीपूरमध्ये वृक्षसंवर्धनाची कमाल – गुलमोहराने रंगली हिरवी क्रांती!”

श्रीपूर  – इन महाराष्ट्र न्यूज-संपादक दत्ता नाईकनवरे
श्रीपूर तालुका माळशिरस येथील  कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर-अकलूज रोडवरील (शहीद निवृत्ती जाधव प्रवेशद्वारापासून), भाडगर कॅनॉल लगत जिगरबाज ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. या उपक्रमाची खरी यशोगाथा आज दिसून येत असून, लावलेली झाडे आता मोठी होऊन वटवृक्षासारखी विस्तारली आहेत.

विशेषतः गुलमोहराची झाडे लाल फुलांनी बहरून परिसराला निसर्गरम्य रूप प्राप्त झाले आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात या झाडांची दाट सावली वाटसरूंना दिलासा देत असून, परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. या हिरव्यागार पट्ट्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना केवळ सावलीच नाही तर आनंदही मिळत आहे. आकर्षक फुलांनी सजलेल्या या झाडांमुळे अनेक नागरिक येथे फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. या उपक्रमातून “वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे” असल्याचा संदेश जिगरबाज ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्र परिवाराच्या वतीने समाजाला मिळत आहे.

झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून मानवजातीसाठी जीवनदायी आधार आहेत.

  • झाडे आपल्याला प्राणवायू (ऑक्सिजन) देतात आणि प्रदूषण कमी करतात.
  • उन्हाळ्यात झाडांची सावली तापमान कमी करून वातावरण प्रसन्न ठेवते.
  • पक्षी, प्राणी यांचे निवासस्थान झाडांमुळे सुरक्षित राहते.
  • रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे वाटसरूंना विश्रांती आणि मानसिक समाधान देतात.
  • गुलमोहरसारखी झाडे फुलांनी बहरून परिसराला सौंदर्य आणि आकर्षण देतात.

👉 त्यामुळे “झाड लावा आणि झाड जगवा” हा संदेश केवळ घोषवाक्य नसून आजची गरज आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!