महाराष्ट्र

वेळापूरजवळ भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू ; (वेळापूर)शेरी गावावर शोककळा

घुमेरा ओढ्यानजिक आयशर टेम्पोची दुचाकीला धडक ; तानाजी माने देशमुख दाम्पत्याचा जागीच मृत्यू

वेळापूर, ता. माळशिरस येथील पोलिस स्टेशन हद्दीत सांगोला रोडवरील घुमेरा ओढ्यानजिक शुक्रवारी (दि. १५ मे) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात शेरी येथील तानाजी शहाजी माने देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी माने देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेरी परिसरासह संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माने देशमुख दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर कॅन्टर (टेम्पो) MH10 AW 4670 वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माने देशमुख दाम्पत्य हे स्वभावाने मनमिळावू, सर्वांशी आपुलकीने वागणारे असल्याने त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये मोठी शोकभावना निर्माण झाली आहे.

रात्री उशिरा शेरी नंबर एक येथे शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे माने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास वेळापूर पोलिसांकडून सुरू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!