श्री चंद्रशेखर विद्यालयाचा दहावीचा ८८.२० टक्के निकाल | यशराज संतोष रेडे प्रथम
श्रीपूरच्या श्री चंद्रशेखर विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ; १९५ पैकी १७२ विद्यार्थी उत्तीर्ण

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता १० वी मार्च २०२६ च्या परीक्षेचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यालयाने ८८.२० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यालयातील एकूण १९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालामध्ये विशेष श्रेणीत २८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ४५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५८ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत ४० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये चि. यशराज संतोष रेडे याने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. समीक्षा रणजीत चव्हाण हिने ९३.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. चि. सार्थक जगदीश इंगळे याने ९२.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. चि. यशराज नागनाथ जाधव याने ९१.८० टक्के तर कु. प्रिती प्रमोद शेळके हिने ९१.२० टक्के गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून चि. सार्थक जगदीश इंगळे याने ९२.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. नोमिता राजेश डांगे हिने ९१.०० टक्के गुणांसह द्वितीय तर चि. ओंकार दिनकर ढवण याने ८५.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. श्री. रामदास आबासाहेब देशमुख, उपाध्यक्षा व माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ. शुभांगिताई रामदास देशमुख, सचिव श्री भारत कारंडे, सदस्य श्री यशराज (भैय्यासाहेब) देशमुख, प्राचार्य श्री पां. बा. बनसोडे, उपमुख्याध्यापक श्री सु. मा. गवळी, पर्यवेक्षक श्री सि. भा. गुरव, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख श्री सु. शं. हासबे, संस्था मान्य पर्यवेक्षक श्री सु. सु. शेंडे तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षक-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



