महाराष्ट्र

मानवता आणि निसर्ग संवर्धनाचे दर्शन घडवणारी अकलूजमधील घटना

भीतीवर मात; अकलूजमध्ये सर्पमित्रांच्या कौशल्यामुळे नागाचा जीव वाचला

साप न मारता वाचवा – प्रणव देशमुख यांनी दिला संवेदनशीलतेचा संदेश


(इन महाराष्ट्र न्यूज | संपादक : दत्ता नाईकनवरे)

युवा सर्पमित्र प्रणव इंगवले देशमुख यांच्या तत्परतेमुळे विषारी नागाला जीवदान

अकलूज, दि. २८ (प्रतिनिधी):
घरात किंवा घराच्या परिसरात साप निघाल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र अकलूज येथील पत्रकार संजय लोहकरे यांच्या घराच्या परसबागेत विषारी नाग आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी सर्प अभ्यासक प्रा.धनंजय देशमुख यांना संपर्क साधण्यात आला. ते बाहेरगावी असल्याने त्यांनी खंडाळी (ता. माळशिरस) येथील युवा सर्पमित्र प्रणव इंगवले देशमुख यांना घटनास्थळी जाण्याचे सांगितले.

क्षणाचाही विलंब न करता प्रणव देशमुख हे घटनास्थळी पोहोचले. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी अत्यंत शिताफीने व सुरक्षित पद्धतीने अत्यंत विषारी नागाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनेमुळे मानव तसेच साप, दोघांचाही जीव सुरक्षित राहिला आहे.

अकलूज परिसरात घराच्या अंगणात, स्वयंपाकघरात, शेतशिवारात, गोठ्यात किंवा कडेलोटाच्या भागात आढळणारे कोब्रा, मण्यार, अजगर, धामण यांसारखे साप सर्प अभ्यासक प्रा. धनंजय देशमुख आणि त्यांनी प्रशिक्षित केलेले नऊ सर्पमित्र अत्यंत संयमाने व कौशल्याने पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात.

ग्रामीण भागात आजही साप दिसताच ठार मारण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मात्र या सर्पमित्रांच्या सातत्यपूर्ण जनजागृती व कार्यामुळे ही मानसिकता हळूहळू बदलू लागली असून सापांबाबत संवेदनशीलता वाढताना दिसत आहे.

नागाची ओळख

  • रंग: काळा, तपकिरी, ऑलिव्ह हिरवा किंवा पिवळसर
  • फणा: फणा काढल्यावर पाठीवर चष्म्यासारखी किंवा ‘U’ आकाराची खूण
  • लांबी: साधारण ३ ते १० फूट
  • स्वभाव: स्वतःहून हल्ला करत नाही; डिवचल्यास बचावात्मक पवित्रा
  • अन्न: उंदीर, बेडूक व लहान कीटक
  • प्रजनन: अंडी घालतो
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!