ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे पंख

श्रीपूर : तालुका माळशिरस येथील इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीपूर येथे दिनांक ८ व ९ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, कलात्मक व सांस्कृतिक गुणवत्तेचे प्रभावी दर्शन घडले.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी शाळेत विज्ञान, भूगोल, गणित, कला व चित्रकला आदी विषयांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक प्रकल्प सादर करून आपले ज्ञान व कल्पकता दाखवून दिली. रांगोळी व चित्रकलेतूनही विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक प्रतिभा सादर केली. या प्रदर्शनासाठी विनायक शंकर जोशी (माजी मुख्याध्यापक, श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर), मेजर राजू नारायण खराडे (सेवानिवृत्त सुभेदार मेजर, इंडियन आर्मी) तसेच मेजर भीमराव किसन इंगोले (सेवानिवृत्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे व कलेचे कौतुक करत त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार उत्तमरावजी जानकर, श्री. रामचंद्र ज्ञानोबा सावंत पाटील (संचालक व माजी व्हाईस-चेअरमन, स.म.शं.मो.पा. साखर कारखाना, यशवंतनगर), डॉ. धनंजय साठे (सहयोगी प्राध्यापक, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर), श्री. अरुण तोडकर (माजी जि.प. सदस्य) तसेच डॉ. आरती सुधीर पोफळे (स्त्रीरोगतज्ज्ञ) उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. रामदास आबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष मा. शुभांगीताई रामदास देशमुख, श्री. यशराज रामदास देशमुख व संस्थेचे सचिव श्री. भारत कारंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. मा. आमदार उत्तमराव जानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करत प्रेरणादायी विचार मांडले, तर श्री. रामचंद्र सावंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष सूर्यवंशी सर यांना स्व. हरिश्चंद्र गायकवाड बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पूर्व-प्राथमिक विभागातून सौ. मनीषा हाके मॅडम, प्राथमिक विभागातून सौ. स्वाती मुंडफणे मॅडम व माध्यमिक विभागातून श्री. निलेश वरकड सर यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर व पालकांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष सूर्यवंशी सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रणजीत साठे सर यांनी केले. या भव्य स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी उपमुख्याध्यापिका सौ. तृप्ती देशपांडे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!