महाराष्ट्र

‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली

'शॉर्ट अँड स्वीट 'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली

First poster of ‘Short and Sweet’ released

गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची कथा संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली असून, या पहिल्या पोस्टरमध्ये ही बाब अत्यंत ठळकपणे अधोरेखित होते. या पोस्टरच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हे कलाकार दिसत आहेत. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ नेतो असे या पोस्टरमध्ये दिसते. दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते.

त्यामुळे या चित्रपटाची चर्चा चित्रपट रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरू झाली आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ ही एक संपूर्णतः कौटुंबिक कथा आहे. ही कथा एका अनपेक्षित आणि अनोख्या अशा कौटुंबिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ओमकार भोजने, रसिका सुनील, तुषार खैर, अजित भुरे आदींच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे सादरीकरण शुभम प्रॉडक्शनचे असून, निर्मिती पायल गणेश कदम आणि विनोद राव यांची आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.

After the exhibition of the poster of the movie ‘Short and Sweet’, the curiosity about the movie increased

First poster of ‘Short and Sweet’ released

After the release of the poster, the curiosity about the film increased

Directed by Ganesh Kadam, the poster of ‘Short and Sweet’ was released recently. The film, which is slated to release on November 3, 2023, has sensitively depicted the story of a small person, and the first poster highlights this very prominently. After the exhibition of this poster, the curiosity about this film has increased.

Sonali Kulkarni, Sridhar Vatsar, Harshad Atkari are seen in this poster of this movie. Its hero Sridhar Vatsar stands on a table and hugs Sonali Kulkarni’s cheekIn this poster it is seen that the lips lead. The visuals underline that the film is interesting and different.

So the discussion of this film has started in film buffs and film industry. ‘Short and Sweet’ is an entirely family story. This story is based on an unexpected and unique family story. The film also stars Omkar Bhojane, Rasika Sunil, Tusshar Khair, Ajit Bhure in lead roles. The film is presented by Shubham Productions and produced by Payal Ganesh Kadam and Vinod Rao. The film is releasing on November 3, 2023.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!