सर्वांचा आधार, युवकांचे सोबती, श्रीकांत शिंदे यांची सेवा आणि संघर्ष कथा
“अजित दादा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर समाजसेवेचा वटवृक्ष”

“शून्यातून विश्व – श्रीकांत शिंदे आणि क्रीडा·नोकरी आरक्षणासाठीचा प्रवास”
“जनसेवा, युवकांसाठीची नवी दिशा — श्रीकांत उर्फ आबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्याचा गौरव”
पंढरपूर :
राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेले नाव म्हणजे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) युवक प्रदेश सरचिटणीस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सामाजिक आणि जनसेवेचे कार्य विशेष चर्चेत आले आहे.
मूळचे श्रीपूर येथील रहिवासी असलेले श्रीकांत(आबा) शिंदे सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत. “कट्टर अजितदादा समर्थक” म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांनी अजित दादा फाउंडेशन ची स्थापना करून युवक, शेतकरी, महिला आणि क्रीडापटूंकरिता अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, रक्तदान, रोजगार आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या आरक्षणासाठी शासन निर्णय प्रसिद्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वर्ष २०१७ पासून रखडलेला हा जीआर त्यांनी क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे थेट पाठपुरावा करून दोन दिवसांत मंजूर करून घेतला. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील हजारो युवकांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला.
युवकांच्या समस्या प्रत्यक्ष मंत्रालयात नेऊन त्यांचे निराकरण करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांना आदर्शवत ठरली आहे. राजकीय सलोखा आणि लोकहिताचा दृष्टीकोन ठेवून त्यांनी सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी समन्वय राखत समाजहिताची दिशा दिली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते, आणि युवकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला असून, “जनतेसाठी अहोरात्र धावणारा नेता” अशी ओळख त्यांना प्राप्त झाली आहे.